सध्या शेती क्षेत्रात तरुणांचे प्रमाण वाढले आहे. वेगवेगळे प्रयोग करून तरुण शेतकरी शेती करताना दिसत आहेत. अशातच येणाऱ्या नव्या पिढीचे देखील शेतीबाबत चांगला दृष्टिकोन तयार व्हावा तसेच शेतीकडे वळणाऱ्या नव्या पिढीकडे वैज्ञानिक दृष्टिकोन असावा, अशी महाराष्ट्र सरकारने इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी महाराष्ट्र सरकार आता नव्या पिढीला शेतीसाठी तयार करण्यास सज्ज झाली आहे.
विद्यार्थीदशेत जर मुलांना शेतीविषयक माहिती दिली तर त्यातून मुलांमध्ये शेतीबाबत ओढ आणि आवड निर्माण होईल. या दृष्टिकोनातून शासनाने आता शाळांमध्ये कृषी शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी दशेतच कृषीचे शिक्षण दिल्यामुळे विद्यार्थ्यांचा या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि भविष्यात कृषी शास्त्रज्ञ बनून तर कधी शास्त्रोक्त पद्धतीने शेती करून देशसेवा करतील. असे, राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले आहे.
कोरोना काळात रोजगाराची सर्व क्षेत्रे ठप्प झाली होती मात्र तरीही अर्थव्यवस्थेची चाके सुरळीत चालवण्यामध्ये कृषी क्षेत्र कामी आलं. हे आपण सर्वांनी
पाहिलं. मात्र या घटनेमुळे केंद्रच नव्हे तर राज्य सरकारांनाही या क्षेत्राचे महत्त्व कळून चुकले. परिणामी सरकारे केवळ कृषी क्षेत्रावरच लक्ष केंद्रित न करता कॉर्पोरेट क्षेत्राकडेदेखील आशेने पाहत आहेत. परंतु चांगली शेती होण्यासाठी संबंधित लोकांचा वैज्ञानिक विचार महत्वाचा आहे. आणि यासाठी शिक्षण खूप महत्त्वाचे आहे.
खाजगी डेअरीचालकांचा मनमानी कारभार; केली दूध खरेदीदरात मोठी घट
कसा असणार अभ्यासक्रम :
कृषी विषयाचा अभ्यासक्रम हा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद तसेच महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात येणार आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांना शेती हा विषय शिकवला जाणार आहे. कृषी मंत्रालयाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.
कृषीच्या उच्च शिक्षणाबाबत सांगायचं झालं तर राज्यात एकूण ६ कृषी विद्यापीठे आहेत. कृषी शिक्षणाचे धडे जर शालेय काळापासूनच सुरू झाले तर,भविष्यात राज्याच्या कृषी क्षेत्राचे चित्र वेगळे दिसेल. शिवाय कृषी क्षेत्रातील अभ्यासामुळे नोकरी व स्वयंरोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध होऊ शकतील.
...असा पण एक निसर्गप्रेमी; चक्क झाड न तोडता बांधले 4 माजली घर, झाडालाच बनवलं घरामधलं फर्निचर
कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे मत -
कृषी सारख्या विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश केला तर विद्यार्थ्यांमध्ये कृषी शिक्षणाची आवड रुजली जाईल. शिवाय ग्रामीण भागात कृषी संशोधक तयार करता येतील. विद्यार्थ्यांच्या वयोमानुसार त्यांना कृषी क्षेत्राशी निगडीत अभ्यासक्रम शिकवला जाईल त्यातून त्यांच्यात वैज्ञानिक वृत्ती निर्माण होईल. नवीन पिढी शेती व्यवसाय सुरू करू शकतील. शिवाय पिकांचे उत्पादन वाढेल. असं वक्तव्य महाराष्ट्राचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.
महाराष्ट्राच्या शेतीबाबत -
महाराष्ट्रात प्रति शेतकरी लागवड ही साधारण 1.34 हेक्टर आहे असून महाराष्ट्रातील एकूण जमिनीपैकी 67.44 % जमिनीवर शेती केली जाते.
शेतकरी कुटुंबाचे मासिक उत्पन्नाबद्दल सांगायचं म्हटलं तर, प्रति शेतकरी कुटुंबाचे सरासरी मासिक उत्पन्न हे केवळ 7,386 इतके आहे.
तुम्हाला माहीतच आहे असेल की, दुर्दैवाने आपल्या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येच प्रमाण हे सर्वाधिक आहे. महाराष्ट्र राज्य हे कृषी कर्जाच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे.कांदा उत्पादक राज्य म्हणून महाराष्ट्राचे नाव समोर येते. शिवाय द्राक्षे, डाळिंब, काजू आणि जगप्रसिद्ध हापूस आंबा इथे पिकवला जातो.
महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्याचा नादच खुळा..! शेतीतला नाविन्यपूर्ण प्रयोग झाला यशस्वी; आता पठ्ठ्याची ३० लाखांची कमाई
Published on: 23 May 2022, 04:28 IST