News

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सध्या उडीदाला चांगला भाव (Good price) मिळत आहे. त्यामुळे उडीद दाळीचे दर देखील तेजीत आहेत. येणाऱ्या दिवसात देखील चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे.

Updated on 02 September, 2022 12:53 PM IST

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सध्या उडीदाला चांगला भाव (Good price) मिळत आहे. त्यामुळे उडीद दाळीचे दर देखील तेजीत आहेत. येणाऱ्या दिवसात देखील चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे.

उडीदाचे दर वाढणार असल्याने केंद्र सरकार (central government) नाफेडमार्फत (Nafed) आयात उडिदाची खरेदी करणार आहे. पुढील दोन महिने सणांचे आहेत. उडदाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळं सरकारला दर नियंत्रणासाठी उडीद पुरवठा करणं गरजेचं आहे.

Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरची उद्यापासून विक्री सुरू; जाणून घ्या किंमत आणि खास वैशिष्ट्ये

मात्र सरकारकडे उडदाचा केवळ ३५ हजार टन बफर स्टाॅक (Buffer stack) आहे. त्यातच सध्या देशात उडदाची आवक बाजारात वाढलेली नाही.

त्यामुळं केंद्र सरकारने नाफेडला व्यापाऱ्यांकडून आयात उडदाची खरेदी करण्यास सांगितले आहे. त्यासाठी निविदाही मागवल्या आहेत. मात्र त्यासाठी आंतरराष्ट्रीय निविदा न काढता आयातदारांकडून निविदा मागवल्या आहेत.

नाफेड २५ हजार ते ३५ हजार टन आयात उडीद खरेदी करण्याची शक्यता आहे. रोज २ हजार टन उडदाची खरेदी होईल. नाफेड आयात मालाची पहिल्यांदाच खरेदी करत नाही. यापुर्वी तीन वेळा नाफेडने अशी खरेदी केली आहे.

या लोकांना आज मिळणार बाप्पाचा आशीर्वाद; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य

आयात उडीद दर

सध्या आयात उडदाचे दर ७ हजार ते ७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. जो व्यापारी कमी किमतीत उडीद देईल, त्याच्याकडून नाफेड खरेदी करणार आहे.

परिणामी चालू हंगामात लागवड (cultivation) कमी झाली. सरकारवर आयात उडीद खरेदी करण्याची वेळ आली. त्याऐवजी सरकारने खरेदीत उतरून बाजाराला आधार दिला असता तर उत्पादन कमी राहिल्यानं खुल्या बाजारातही दर सुधारले असते.

महत्वाच्या बातम्या 
शेतकऱ्यांना मोठा फटका! बटाटा-टोमॅटोच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या दर
सोयाबीनच्या बाजारभावात चढ की उतारा? वाचा आजचे सोयाबीनचे दर
एलआयसी फक्त 100 रुपयांमध्ये देत आहे 75 हजार रुपयांचा नफा

English Summary: farmers Udida prices increasing government
Published on: 02 September 2022, 12:42 IST