News

यंदा राज्यात उशिरा मान्सून दाखल होत आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे पावसाने पाठ फिरवली आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. अनेकांनी पेरण्या केल्या आणि पाऊस गायब झाला आहे.

Updated on 20 June, 2023 11:36 AM IST

यंदा राज्यात उशिरा मान्सून दाखल होत आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे पावसाने पाठ फिरवली आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. अनेकांनी पेरण्या केल्या आणि पाऊस गायब झाला आहे.

राज्यात पेरण्याही पावसामुळे रखडल्या आहेत. यामुळे शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. पाऊस तळकोकणात आला असला तरी तो राज्यातून गायब झाला आहे. अशातच आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. आता राज्यात २६ जूननंतर मान्सून सक्रिय होणार आहे. यामुळे आता अजून एक आठवडा वाट बघावी लागणार आहे. खरिपाच्या पेरणीसाठी आवश्यक पावसासाठी आणखी एक आठवड्याचा कालावधी लागेल.

खरे की बनावट, हे खत कसे? शेतकरी बंधुनो या टिप्स त्वरित जाणून घ्या

काही शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. यामुळे जर पाऊस जर पडलाच नाही तर पेरलेले उगवेल का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे. निम्मा जून महिना संपत आला तरी पाऊस न पडल्याने हवामान खात्याने शेतकऱ्यांना पेरण्या न करण्याचा महत्त्वाचा सल्ला दिला होता.

येत्या 72 तासांत मान्सून महाराष्ट्र व्यापणार! हवामान विभागाकडून मोठी माहिती..

यामुळे यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आता हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार तरी पाऊस पडणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे याकडे लक्ष लागले आहे.

गाईच्या दुधाला लिटरला 75 रुपये दर तर म्हशीच्या दुधाला सव्वाशे रुपये दर द्या, सदाभाऊ खोत यांची मागणी
खरे की बनावट, हे खत कसे? शेतकरी बंधुनो या टिप्स त्वरित जाणून घ्या
गुलटेकडी मार्केटमध्ये तरकारी भाजीपाल्याची विक्री बंद! प्रशासनाचा निर्णय..

English Summary: Farmers get ready! Rain will enter the state after June 26, farmers are happy.
Published on: 20 June 2023, 11:36 IST