News

निसर्गाच्या लहरीपणाने आणि अस्मानी संकटाने पिचलेल्या शेतकऱ्याला विमा कंपनीचा गेल्या काही दिवसांपासून एक आधार वाटू लागला होता. त्यामुळे शेतकरी आपल्या पिकांसह फळबागांचा विमा काढू लागले आहेत.

Updated on 04 May, 2022 5:44 PM IST

निसर्गाच्या लहरीपणाने आणि अस्मानी संकटाने पिचलेल्या शेतकऱ्याला विमा कंपनीचा गेल्या काही दिवसांपासून एक आधार वाटू लागला होता. त्यामुळे शेतकरी आपल्या पिकांसह फळबागांचा विमा काढू लागले आहेत. अर्थात विमा पद्धती ग्रामीण भागासह शेतकऱ्यांमध्ये चांगलीच रुजू लागली आहे. परंतू झालेल्या नुकसानीला पाच महिने उलटून गेले तरी पिक विम्याचे पैसे न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

मागील वर्षी खरीप हंगामात सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांनी तूर पिकाचा विमा उतरवला होता. शिवाय संबंधित कंपनीकडे त्याचा हप्ता देखील जमा केला होता. मात्र तालुक्यातील अनेक शेतकरी पीक नुकसान भरपाई पासून वंचित असल्याचे समोर आले आहे. विमा काढताना विमा कंपनीकडून विविध अटी आणि शर्ती लागू केल्या जातात. त्यानूसार शेतकऱ्यांनी त्यांच्या झालेल्या पिकाचे नुकसान ७२ तासांच्या आत विमा कंपनीला कळवणे बंधनकारक आहे.

डाळिंब फळ प्रक्रिया आणि फायदे...

परंतू पाच महिने उलटून सुद्धा अनेक शेतकऱ्यांना विमा कंपनीने पैसे दिले नाहीत. याबाबत मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तालुक्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जोरदार अवकाळी पाऊस पडला होता. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या तूर, मका आणि बाजरी सारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले. याबाबत शेतकऱ्यांनी विमा कंपनीला ऑनलाईनसह कृषी खात्यामार्फत देखील लेखी तक्रार केली होती. तरीदेखील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्याचे शेतकरी सांगत आहेत.

आनंदाची बातमी : अतिरिक्त ऊसाचे पूर्ण गाळप होणार : साखर आयुक्त

तर काही शेतकऱ्यांना विमा कंपनीने दिलेली नुकसान भरपाई तुलनेने फारच शुल्लक असल्याने अनेक शेतकरी अवाक झाले आहेत. तर काही विमा कंपनीच्या मोबाईल ऍपवर कित्येक दिवस एकच सध्यस्थिती दिसत असल्याने विमा कंपनीच्या कारभाराबाबत शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक शेतकरी सोलापूर येथे हेलपाटे घालून थकले आहेत. त्यामुळे 'चार आण्याची कोंबडी अन बारा आण्याचा मसाला' अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.

त्यामुळे विमा कंपनीच्या मनमानी कारभाराबद्दल शेतकरी हैराण झाले आहेत. विमा कंपनीला नुकसानीची माहिती ७२ तासांत देणे बंधनकारक आहे. मग शेतकऱ्यांना नुकसान मिळण्यासाठी काही नियमावली नाही का असा सवाल देखील शेतकरी विचारात आहे.

कृषिप्रधान देशाचा कणा "शेतकरी"

पोटाला चिमटा घेऊन शेतकरी विमा हप्ता भरतात त्यांना देखील वाटत नाही कि आपल्या पिकाचे नुकसान व्हावे. मात्र, नुकसान झाल्यास आपल्याला विमा कंपनी नक्कीच भरपाई देईल अशी आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या नशिबी पुन्हा तीच परवड आल्याचे दिसत आहे.

आता 'या' कारणामुळे बिअरचे दर वाढणार...
IT RETURNS : आयटी रिटर्न डिव्हिजन मध्ये बदल

English Summary: Farmers deprived of the scheme
Published on: 04 May 2022, 05:43 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)