News

गेल्या काही दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अचानक कांदा दरात घसरण झाल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. यामुळे कांद्याला बाजारभाव देण्याची मागणी केली जात आहे.

Updated on 15 June, 2023 10:48 AM IST

गेल्या काही दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अचानक कांदा दरात घसरण झाल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. यामुळे कांद्याला बाजारभाव देण्याची मागणी केली जात आहे.

यामुळे शेतकऱ्यांनी मुंबई ते आग्रा महामार्गावर कांदे फेकत निषेध व्यक्त केला आहे. मालेगावच्या मुंगसे बाजार समिती समोर हा प्रकार घडल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. बाजार समितीत झालेल्या लिलावात भाव नसल्याने शेतकऱ्यांनी थेट रस्त्यावर कांद्याने भरलेली वाहने उभी करत कांदे रस्त्यावर फेकून दिले.

यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. अतिवृष्टी, गारपीट यामधून कसाबसा बाहेर पडणारा शेतकरी कांद्याला भाव नसल्याने पुन्हा हतबल झाला आहे. नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी थेट नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील मुंगसे उपबाजार समिती समोर असलेल्या महामार्गावर कांदे फेकून देत संताप व्यक्त केला.

शेतकऱ्यांनो पावसाळा येतोय, पावसाळ्यात जनावरांची कशी काळजी घ्यावी? जाणून घ्या...

नाशिक आणि जळगावमधील फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. या फटक्यातून शेतकरी सावरत असतानाच आता कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. यामुळे शेतकरी दुहेरी संकटांचा सामना करत आहेत.

त्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्याचा मोठा फटका कांद्यासह इतर पिकांना बसला होता.

लसणाची प्रति किलो दोनशे रूपयांकडे वाटचाल, शेतकरी सुखावला...

दरम्यान, मागच्या महिन्यांपासून झालेल्या अवकाळी पावसाचा नाशिक जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या कांदाचे मोठे नुकसान झाले होते. 

५५०० रुपये लिटरला गाढवाचे दूध विकणारा हा माणूस झाला करोडपती
शेतकऱ्यांनो पावसाळा येतोय, पावसाळ्यात जनावरांची कशी काळजी घ्यावी? जाणून घ्या...
उन्हामुळे चिकनच्या दरात मोठी, पिलांची मर वाढली..

English Summary: Farmers blocked the Mumbai-Agra highway due to lack of price for onions.
Published on: 15 June 2023, 10:48 IST