शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या बाबतीत विमान प्रवासादरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एअर इंडिया कंपनीकडून प्रवाशांची लुबाडणूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
दोन दिवस आधी तिकीट काढूनसुध्दा प्रवाशांना सीट उपलब्ध करून दिली जात नाही. मात्र ऐनवेळेस येणाऱ्या प्रवाशांना जादा दराने तिकीट विक्री करून प्रवाशांची आर्थिक फसवणूक करत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
एअर इंडिया कंपनीकडून याबाबत गेल्या दोन महिन्यात मुंबई ते भोपाळ व आज दिल्ली ते पुणे या प्रवासादरम्यान असा प्रकार घडून आला आहे. यामुळे राजू शेट्टी यांनी विमानतळावर गोंधळ घातला आहे.
आता शेती विकत घेण्यासाठी सरकारकडून मिळते अनुदान, जाणून घ्या काय आहे योजना..
गेल्या दोन महिन्यांपूर्वी 18 ॲाक्टोंबर रोजी राजू शेट्टी यांनी मुंबई ते भोपाळ तिकीट चार दिवस आधीच काढले होते. ते सकाळी 4 वाजताच विमानतळावर राजू शेट्टी पोहचले होते.
असे असताना बोर्डिंग पास काढण्यासाठी गेले असता एअर इंडियाच्या प्रशासनाकडून सीट उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी त्यांनी बराच वाद घातला.
जनावरे रोडवर सोडली तर होणार गुन्हा दाखल! नाशिकमध्ये पहिला गुन्हा दाखल
नंतर त्यांना त्याच विमानाचे बिझनेस क्लासचे तिकीट उपलब्ध करून देण्यात आले. तसेच दिल्लीहून पुण्याला येत असताना बोर्डींग बंद होण्याच्या 45 मिनीट आधी पोहचूनही व दोन दिवस आधी तिकीट काढूनही सीट उपलब्ध नसल्याचे एअर इंडियाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले.
यामुळे सीट न मिळाल्याने संतापलेल्या राजू शेट्टी यांनी प्रशासनाबरोबर त्याठिकाणी चांगलाच गोंधळ घातला. असे अनेक प्रवाशांसोबत घडत आहे. यामुळे हे थांबले पाहिजे.
महत्वाच्या बातम्या;
जनावरांचा बाजार शुक्रवारपासून सुरू, शेतकरी व्यापाऱ्यांना दिलासा..
जनावरांचा बाजार शुक्रवारपासून सुरू, शेतकरी व्यापाऱ्यांना दिलासा..
कोरोना पुन्हा वाढला! केंद्रीय मंत्र्यांचे मास्क सक्तीबाबत मोठे वक्तव्य
Published on: 22 December 2022, 03:05 IST