शेतात काम करत असताना शेतकऱ्यांसोबत अनेक धक्कादायक घटना घडतात. आता बारामतीमधील बोरकरवाडीतील एक दुःखद घटना घडली आहे. येथे स्वतःच्या शेतात काम करताना ट्रॅक्टर खाली सापडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
यामुळे दुःख व्यक्त केले जात आहे. आकाश सुभाष बोरकर असे या शेतकऱ्याचे नाव आहे. आकाश बोरकर हे त्यांच्या शेतात आज सकाळी उसाची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन गेले होते.
हा छोटा ट्रॅक्टर घेऊन उसाची बांधणी करत असताना अचानक बांधाच्या बाजूला एकेरी चाक होऊन ट्रॅक्टर पलटी झाला. त्यावेळी ट्रॅक्टर खाली आकाश सापडला. यामुळे मदतीसाठी कोणी नसल्याने बाहेर पडणे अवघड झाले.
12 वी च्या निकालाची तारीख ठरली! उद्याच लागणार ऑनलाइन निकाल
त्याच्या जवळ कोणीही मदतीसाठी नसल्याने त्याला ट्रॅक्टर खालून निघता आले नाही. त्यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचे वय केवळ 22 एवढे होते. घटनेची माहिती मिळताच सगळीकडे एकच गोंधळ उडाला.
राज्यात अजूनही ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे 850 कोटी थकीत, सरकार कारखान्यांवर कारवाई करणार का.?
दुपारी मजुरीसाठी असलेल्या महिलांनी हा प्रकार पाहिला आणि त्यानंतर सगळीकडे माहिती पसरली. त्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. या घटनेचा पुढील तपास रुपेश साळुंखे करत आहेत.
श्रीमंतांची भाजी! ही भाजी एक लाख रुपये किलो दराने विकली जाते, मोजकेच लोक खातात ही भाजी..
कांदा निर्यातीत मोठी वाढ, दरांकडे शेतकऱ्यांचे लक्ष...
शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर FRI दाखल करा, देवेंद्र फडणवीसांचे थेट आदेश..
Published on: 25 May 2023, 10:17 IST