राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहेत. दरवर्षी त्यांना ऊसदरासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. असे असताना साखर कारखानदारांकडून सर्रास काटामारी होते. एका वाहनामागे सुमारे दोन ते अडीच टनांची काटामारी हमखास होते. किमान ३१०० रुपयांचा ऊसदर गृहीत धरल्यास या काटामारीतून कारखानदार वर्षाकाठी सुमारे चार हजार ५८१ कोटी रुपयांचा दरोडा टाकतात.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी याबाबत माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. यामध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर लूट होत आहे. तसेच विनापावती साखरेची विक्री करून सरकारच्या सुमारे २५० कोटी रुपयांच्या जीएसटीलाही चुना लावतात. याबाबत शासनाने साखर कारखान्यांच्या गोदामावर अचानक छापे टाकावेत आणि बेहिशेबी साखर किती आहे तपासावे, अशी मागणी देखील त्यांनी केली.
तसेच कायद्यानुसार १४ दिवसांच्या आत एफआरपी द्यावी लागते. असे असताना बहुतांश कारखानदार ती थकवतात. सरकारही त्याबाबत गांभीर्याने लक्ष देत नाही. या प्रश्नावर आम्ही आंदोलन करतो, आरआरसी कारवाईपर्यंत निर्णयही होतो, पण कारखानदारांच्या दबावापुढे प्रशासन हतबल होते. कारखान्यांचे काटे ऑनलाइन करा, ही आमची मागणी आहे.
काय सांगता! जास्त काम केले तर कॉम्प्युटरचा माऊस पळून जाणार, तो पकडताही येणार नाही..
शेतकऱ्यांचे हित कुठेही बघितले जात नाही, यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. साखर कारखान्यांचे २०० काटे ऑनलाइन करणे फार अवघड गोष्ट नाही. पण, सरकारची इच्छाच नाही. काटामारी हा मोठा प्रश्न बनला आहे. अनेकांच्या ते लक्षात देखील येत आहे. अनेक कारखाने काटामारी करत आहेत. एका वर्षात एक कारखाना किमान ७० हजार टन उसाची काटामारी करतो, असेही राजू शेट्टी म्हणाले.
यंदाच्या हंगामात पूर्ण आणि एकरकमी एफआरपी मिळावी, बंद कारखान्यांच्या विक्रीत थकीत एफआरपीचा विचार होत नाही. बँका त्यांचे पैसे काढून घेतात, पण शेतकऱ्याच्या पैशाचा कोणी विचार केला जात नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना बरीच आश्वासने दिली आहेत. मात्र नंतर त्याकडे कोणीही लक्ष देत नाही.
Lumpy Diseases: लम्पी रोगावर स्वदेशी लस विकसीत, पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा..
मुख्यमंत्र्यानी टप्प्या-टप्प्याने आश्वासने पूर्ण करावीत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. येणाऱ्या काळात एकरकमी एफआरपी मिळाली नाही तर कारखाने सुरु होऊन देणार नसल्याचे देखील राजू शेट्टी त्यांनी सांगितले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
लम्पी रोगानंतर शेतातही आला चायनीज व्हायरस, शेतकऱ्यांनी पिके केली नष्ट
साखरेची किमान विक्री किंमत 3100 वरून 3600 रुपये प्रति क्विंटल करण्याची मागणी, कारखान्यांना अतिरिक्त बँक कर्ज मिळेल..
लम्पीरोग झालेल्या गाई म्हशींचे दूध प्यावे का? दुधाबाबतच्या अफवेला आलाय ऊत...
Published on: 13 September 2022, 02:38 IST