News

गेल्या काही वर्षांपासून साखर कारखानदारीत अनेक चढ उतार आले आहेत. अनेक कारखाने यामुळे बंद पडले आहेत. तर अनेक कारखाने शेतकऱ्यांना पैसे देऊ शकले नाहीत. असे असताना आता याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. कारखाने चालवणे किती अवघड झाले आहे, याचा पाढा त्यांनी वाचला आहे.

Updated on 23 May, 2022 3:23 PM IST

गेल्या काही वर्षांपासून साखर कारखानदारीत अनेक चढ उतार आले आहेत. अनेक कारखाने यामुळे बंद पडले आहेत. तर अनेक कारखाने शेतकऱ्यांना पैसे देऊ शकले नाहीत. असे असताना आता याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. कारखाने चालवणे किती अवघड झाले आहे, याचा पाढा त्यांनी वाचला आहे.

अजित पवार म्हणाले की, सातारा जिल्ह्यात खंडाळा, किसनवीर, प्रतापगड हे साखर कारखाने बंद पडले आहेत. तर विदर्भ, मराठवाड्यात अनेक कारखाने बंद आहेत. यामुळे जवळपास १२ ते १३ कारखाने चालविण्यासाठी द्यायचे आहेत. कोणामध्‍ये धमक असेल तर त्यांनी ते घेवून चालवून दाखवावेत, असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले आहे. यामुळे याची सध्या चर्चा सुरू आहे.

अजित पवार म्हणाले, अनेकदा साखर कारखाने चालविण्यासाठी घेतले की आरोप-प्रत्यारोप हाेतात. मात्र कारखाना चालवणे किती जिकरीचे आहे. कोणात धमक असेल तर नियमांनुसार त्यांनी जरूर ते चालविण्यासाठी घ्यावेत. जेव्हा स्वतः कारखाना चालवण्याची वेळ येते तेव्हा मागे सरकतात, हा अनुभव मला आहे. असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. ते बारामतीमध्ये बोलत होते.

अतिरिक्त ऊस उत्पादकाने उघड्यावर मांडला संसार, 20 महिन्याचा ऊस झाला तरीही तोड नाहीच

अजित पवार म्हणाले, याबाबत अनेकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मला कुठून दुर्बुद्धी सुचली आणि साखर कारखाने चालवायला घेतले, असे वक्तव्य केले आहे. कारखाने चालवायला घेवून पश्चाताप होत असल्याचे गडकरी म्हणाले आहेत. त्यावरून कारखाने चालवायला घेणे किती जिकिरीचे काम आहे याचा अंदाज घ्या, असेही ते म्हणाले.

दरम्यान, सध्या राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. सगळी यंत्रणा काम करत असली तरी अनेकांचे ऊस अजूनही शेतातच आहेत, अनेकांनी आपले ऊस पेटवले असून शेतकरी आत्महत्या करत आहेत. उशिरा ऊस गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे आता शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

महत्वाच्या बातम्या;
ऊस, कांदा उत्पादकांच्या व्यथांचा भोंगा कोण वाजवणार! तुम्हाला फक्त मतदानाला विचारणार
महादेव जानकरांनी थेट गाईच्या धारा पिळत मांडले दुग्ध व्यवसायातील आर्थिक गणित, वाचा...
पेट्रोल- डिझेल स्वस्त, फायदा थेट शेतकऱ्यांचा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मारले एका दगडात दोन पक्षी

English Summary: "Everybody backs down when it comes to running their own factory. This is my experience."
Published on: 23 May 2022, 03:23 IST