News

शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील असते.आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

Updated on 23 June, 2022 10:25 AM IST

शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील असते.आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज फेडले आहे अशा शेतकरी बंधूना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणीत होणार आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेत अनन्यसाधारण महत्व असणारं क्षेत्र म्हणजे शेती. आज नाही म्हटलं तरी जवळजवळ ६० ते ७०% लोक ही शेती आणि शेतीच्या निगडित व्यवसायांशी संबंधित असतात. आणि त्यामुळेच विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते.

लाखो शेतकऱ्यांना दिलासा
शेतकऱ्यांना 'शेतकरी कर्जमुक्ती' योजने अंतर्गत कर्जमाफी देण्यात आली. मध्यंतरी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नियमित पीक कर्ज फेडणाऱ्या शेतकरी बंधूना प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 च्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी वेळेत कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना प्रोत्सानपर अनुदान देण्याची मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

2017-18, 2018-19 आणि 2019-20 या तीन वर्षांसाठी नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ त्याच शेतकरी बंधूना घेता येणारं आहे ज्यांनी 2017-18 या वर्षात घेतलेले अल्प मुदत पीक कर्जाची 30 जून 2018पर्यंत पूर्णतः परतफेड केली आहे. तसेच 2018-19 या वर्षातील अल्प मुदत पीक कर्जाची 30 जून 2019पर्यंत पूर्णतः परतफेड केली आहे.

प्रचंड मागणी असलेल्या 'हा' व्यवसाय देईल महिन्याला लाखो रुपये, जाणून घ्या सविस्तर माहिती

त्याचप्रमाणे 2019-20 या वर्षातील अल्प मुदत पीक कर्जाची 31 ऑगस्ट 2020पर्यंत पूर्णतः परतफेड केली आहे. अशा शेतकरी बंधूना 2019-20 या वर्षातील अल्प मुदत पीक कर्जाच्या रकमेवर 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. एवढंच नाही तर 2019-20 या वर्षात घेतलेल्या आणि त्याची वेळेत परतफेड केलेल्या अल्प मुदत पीक कर्जाची रक्कम जर 50 हजारांपेक्षा कमी असेल तर अशा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष घेतलेल्या अल्प मुदत पीक कर्जाच्या मुदलाच्या रकमेइतका प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येईल.

मात्र यासाठी केवळ राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना दिलेले अल्प मुदत पीक कर्जाचाच विचार करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या:
'हे लसणाचे वाण देतील भरपूर उत्पादन, जाणून घेऊ लसणाची लागवड पद्धत
रात्री 'हे'लक्षण दिसत असेल तर आतापासून व्हा सावध,असू शकतो डायबिटीस

English Summary: Even if the government falls, it will work, but Dada will fulfill his word !! 50 thousand given to farmers ...
Published on: 23 June 2022, 10:25 IST