News

सध्या वेगवेगळ्या योजनेअंतर्गत इथेनॉल प्रकल्पांना परवानगी देण्याचा कार्यक्रम मोदी सरकारने वेगात सुरू केला आहे. यामुळे सध्या इथेनॉल देखील वाढणार आहे. यावर्षी देशाची इथेनॉल क्षमता (Ethanol Production) सध्याच्या क्षमतेपेक्षा २५ टक्क्यांनी वाढून १२५० कोटी लिटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

Updated on 16 January, 2023 4:22 PM IST

सध्या वेगवेगळ्या योजनेअंतर्गत इथेनॉल प्रकल्पांना परवानगी देण्याचा कार्यक्रम मोदी सरकारने वेगात सुरू केला आहे. यामुळे सध्या इथेनॉल देखील वाढणार आहे. यावर्षी देशाची इथेनॉल क्षमता (Ethanol Production) सध्याच्या क्षमतेपेक्षा २५ टक्क्यांनी वाढून १२५० कोटी लिटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

या फलस्वरूप ही क्षमता वाढणार आहे. केंद्रीय खाद्य आणि सार्वजनिक मंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली. २० टक्के इथेनॉल मिश्रण करण्यासाठी आणखी काही प्रकल्पांना मंजुरी देण्याचे काम वेगात सुरू आहे.

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण २०१३-१४ मध्ये १.५३ टक्के होते ते २०२२ पर्यंत १०.१७ टक्क्यांपर्यंत वाढले. २०२५-२६ ते २०३० पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचे लक्ष्य आहे. इथेनॉलवरील जीएसटी १८ टक्के वरून ५ टक्के करण्यात आल्याने याचाही फायदा इथेनॉल निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांना होत आहे.

आगामी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मिळणार भेट, PM किसान सन्मान निधीची रक्कम वाढण्याची शक्यता...

दरम्यान, या सर्व गोष्टीचा विचार केल्यास केंद्र शासन इथून पुढील काळातही या प्रकल्पांना सातत्याने मंजुरी देण्याची भूमिका घेऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. आतापर्यंत २८१ प्रकल्पांना केंद्राने मान्यता दिली आहे.

ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी सरकार देणार पैसे, मजूर टंचाई आणि फसवणुकीवर निघणार तोडगा..

तसेच पंधरा दिवसाला पाच ते दहा इथेनॉल प्रकल्पांना तत्त्वतः मान्यता देण्याचे काम वेगात सुरू असल्याचे केंद्र सूत्रांनी सांगितले. सध्या धान्यावर आधारित इथेनॉल प्रकल्पाची क्षमता ३३६ कोटी लिटर आहे. यामध्ये सातत्याने वाढ होत आहे.

महत्वाच्या बातम्या;Red Ladyfinger: शेतकऱ्यांनो एकदा लाल भेंडी लावाच, मोठ्या मागणीमुळे मिळतोय जास्तीचा भाव..
एकदा लावले की ४० वर्ष पैसाच पैसा!! बांबू शेती ठरतेय फायदेशीर..
शेतकऱ्यांनो जैविक खत मातीसाठी अमृत

English Summary: Ethanol capacity in the country will increase by 25 percent, farmers will benefit.
Published on: 16 January 2023, 04:22 IST