News

राज्यात भाजप- शिवसेना युतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर आठ महिन्यात मोठ्या प्रमाणात निर्णय घेतले. प्रत्येक प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेऊन शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल याकडे, सरकार लक्ष देत आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

Updated on 11 March, 2023 9:14 AM IST

राज्यात भाजप- शिवसेना युतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर आठ महिन्यात मोठ्या प्रमाणात निर्णय घेतले. प्रत्येक प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेऊन शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल याकडे, सरकार लक्ष देत आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

तसेच अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना केवळ सात हजार कोटींची मदत केली. मात्र आमच्या सरकारने आठ महिन्यात १२ हजार कोटी रुपयांची मदत दिली याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधले.

आता आगामी तीन वर्षांत राज्यातील ३० टक्के कृषी फीडर सौर ऊर्जेवर आणणार असून, यामुळे शेतकऱ्यांना सध्याच्या वीज दरापेक्षा निम्म्या किमतीत वीज मिळेल. यामुळे शेतकऱ्यांना दिवसाही आवश्यक तेवढी मुबलक प्रमाणात वीज मिळेल, असेही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.

शेततळे योजनेचा विस्तार, जलयुक्त शिवारला संजीवनी, अर्थसंकल्प जाणून घ्या

कांदा निर्यातीवर कोणतीही बंदी नाही. उलट गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १६ टक्के निर्यात जास्त झाली आहे. ‘नाफेड’च्या माध्यमातून आतापर्यंत ४५ हजार ७९६ टन कांदा सरासरी ९४२ रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात आला आहे.

उत्तम कापूस निर्मिती प्रकल्पमार्फत जागतिक महिला दिवस साजरा

कांदा उत्पादक शेतकऱ्याला सरकारने वाऱ्यावर सोडलेले नाही. महाराष्ट्राकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढत असून यावर्षी राज्य पुन्हा परदेशी थेट गुंतवणुकीमध्ये अव्वल स्थानी येईल. असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या;
हरियाणामध्ये 39 व्या राज्यस्तरीय पशु मेळाव्याचे आयोजन, विजेत्याला 50 लाख रुपये मिळणार
राज्यातील बाजार समितींत शेतकऱ्यांना मुक्कामासाठी शेतकरी भवन आणि जेवणासाठी थाळी मिळणार..
खते खरेदीसाठी आता शेतकऱ्यांना सांगावी लागणार जात, अजब निर्णयामुळे चर्चांना उधाण..

English Summary: Electricity will be provided to farmers at half price! Information about Fadnavis
Published on: 11 March 2023, 09:14 IST