News

सध्या विजेची मोठी समस्या निर्माण झाली आहे. तसेच बिले भरण्यासाठी देखील वाद होत आहेत. महाराष्ट्रातील वीजदर इतर राज्यांच्या तुलनेत अधिक असल्याने त्याचा उद्योग जगतावर परिणाम होत आहे.

Updated on 31 July, 2023 10:22 AM IST

सध्या विजेची मोठी समस्या निर्माण झाली आहे. तसेच बिले भरण्यासाठी देखील वाद होत आहेत. महाराष्ट्रातील वीजदर इतर राज्यांच्या तुलनेत अधिक असल्याने त्याचा उद्योग जगतावर परिणाम होत आहे.

बेकायदेशीर वीजदर वाढ आणि सर्वच गैरप्रकाराची चौकशी करावी, अशी विनंती करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल झाली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तसेच अश्वशक्तीचा वापर अधिक दाखवून देयके अनेक विभागात काढली गेली. कृषीसाठी ३५ हजार ५६४ मिलियन युनिट वापर केल्याचे दाखवले आहे. मात्र शेतकऱ्यांकडून १७ हजार मिलियन युनिटच्यावर विजेचा वापर होऊ शकत नाही.

या फुलाची लागवड करून शेतकरी होत आहेत श्रीमंत, जाणून घ्या कशी केली जाते लागवड

यामध्ये तब्बल २० हजार मिलियन युनिटचा वापर अधिकचा दाखवला आहे. त्यामुळे वीजमीटरशी आधारकार्ड जोडावे, अशी विनंती ऊर्जा क्षेत्रातील अभ्यासक, अभियंता अजित देशपांडे यांनी ॲड. गिरीश नाईक-थिगळे यांच्यामार्फत दाखल केलेल्या जनहित याचिकेत केली आहे.

सासवडमध्ये ज्वारीला उच्चांकी ६३११ रुपये दर, शेतकऱ्यांना दिलासा...

याची पुढील सुनावणी १७ ऑगस्ट रोजी होणार आहे. प्रतिवादींकडून सहायक सरकारी वकील पी. के. लखोटिया, ॲड. उत्तरवार व ॲड. बजाज यांनी काम पाहिले. यामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लवंगाची शेती आहे खूपच फायदेशीर, जाणून घ्या..
भारतातील या राज्यात सर्वाधिक महाग टोमॅटो विकला जातोय, तोडले सगळे रेकॉर्ड..
राज्यात आता खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालये, राज्य सरकारचा निर्णय...

English Summary: Electricity tariff in Maharashtra is highest than other states, PIL filed to reduce tariff..
Published on: 31 July 2023, 10:22 IST