राज्याचा ऊस गळीत हंगाम नुकताच संपला, या गळीत हंगामात कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकरी यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. गेल्या वर्षी जरंडेश्वर साखर कारखान्यावर (Jarandeshwar Sugar Mill) ईडीकडून झालेली जप्तीची कारवाई आणि यंदा तीन कारखाने बंद असल्यामुळे सातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठं संकट होतं. अतिरिक्त उसाचे गाळप होणार की नाही याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते.
असे असताना यंदा जरंडेश्वर साखर कारखान्यानं ऊसाचं दुसऱ्या क्रमांकाचं विक्रमी गाळप (Second Highest Cane Crushed) केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. अनेकांना या उसाचे काय करायचे असा प्रश्न पडला होता. यंदा राज्यातील ऊस गाळप हंगामात यंदा पहिल्या क्रमांकाचं गाळप माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, दुसऱ्या क्रमांकावर जरंडेश्वर साखर कारखाना आहे. या कारखान्यांनी शेतकऱ्यांना मोठी संजीवनी दिली आहे.
जून पर्यंत कारखाने सुरू ठेवले तरी मात्र काहींचे ऊस फडातच आहेत. अनेकांनी ऊस पेटवून दिले. दरम्यान गेल्या हंगामात म्हणजे 2020-21 मध्ये जरंडेश्वरमध्ये 14.38 लाख टन ऊसाचं गाळप झाले होते. त्याचा मोबदला म्हणून शेतकऱ्यांना 420.67 कोटी रुपये देण्यात आले होते. यंदाच्या हंगामात 2021-22 मध्ये जरंडेश्वरमध्ये 19.98 लाख टन ऊसाचे गाळप झाले.
आसाममध्ये पुराचा हाहाकार! 50 लाख लोक बाधित, मंत्री मात्र ठेवत आहेत बंडखोर आमदारांवर लक्ष
राज्यातील यंदाच्या गाळप हंगामातील एका कारखान्यात झालेले ऊसाचे हे दुसऱ्या क्रमांकाचे विक्रमी गाळप आहे. सर्वांत जास्त ऊस गाळप विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यात यंदा झाले. सोलापूरमधील माढा तालुक्यातील या कारखान्यात यंदा 24.78 लाख टन ऊसाचे गाळप झाले. ऊस शिल्लक असल्यामुळे कारखाने जास्त दिवस चालू ठेवण्यात आले.
महत्वाच्या बातम्या;
काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल सगळं ओके!! सकाळी स्पा, मसाज, जीम; आमदारांचा दिनक्रम ऐकून व्हाल चकीत
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार नाही ५० हजार रुपयांचे अनुदान? वाचा अटी
महाराष्ट्रातील तरुणाने भरला राष्ट्रपती पदासाठी अर्ज, चर्चांना उधाण...
Published on: 28 June 2022, 05:13 IST