मालेगाव : तसं बघायला गेलं तर शेती व्यवसाय करणे जोखमीचं काम. प्रचंड मेहनत, पूर्वनियोजन सगळं काही केलं तरी कोणत्या न कोणत्या गोष्टीमुळे शेतकरी बंधूना नुकसानीला सामोरे जावेच लागते.शेती हेच शेतकऱ्यांचे जगण्याचे साधन असलं तरी शेती व्यवसाय करताना शेतकरी बंधूना अनेक अडचणींचा डोंगर पार करावा लागतो. कधी आपत्कालीन परिस्थितीमुळे, तर कधी वादळी वाऱ्यामुळे, शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान तर होतेच मात्र त्यांचे आर्थिक गणितही फसते.
तर कधी अमाप मेहनत घेऊनही बाजारात मिळत असलेल्या कवडीमोल भावामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शेतकरी बंधू केवळ मुख्य पिकांवर अवलंबून राहत नाहीत. मुख्य पिकांबरोबर भाजीपाल्याचीही लागवड करतात. मात्र निसर्गाचा लहरीपणामुळे पिकांचा दर्जा खालावला जातोय तर दुसरीकडे बाजारपेठेतही हवा तितका भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाची दुष्काळात तेरावा महिना अशीच काहीशी परिस्थिती झाली आहे.
मेथीच्या दरात घट झाल्यामुळे घेतला निर्णय
देवळा तालुक्यातील वासोळ येथे राहणाऱ्या शेतकरी नारायण गिरासी यांनी आर्ध्या एकरामध्ये मेथीची लागवड केली होती. तीन महिने भाजीपाल्याची चांगली जोपासना केली. मात्र ऐन वेळी म्हणजेच विक्रीच्या वेळी मेथीच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. दरात घट झाल्याने वाहतूक व विक्रीचा खर्चदेखील परवडत नसल्याने भाजीपाल्यावरच रोटर फिरवून क्षेत्र रिकामे केले. सध्या सोयाबीन, हरभरा, तसेच तुरीच्या दरातही घट होत चालली आहे.
खरीप पीक घेण्याची तयारी
शेतकरी नारायण गिरासी यांनी अर्ध्या एकरामध्ये मेथीची लागवड केली. मेथीमधून चांगले उत्पन्न मिळेल असा त्यांचा समज होता. मात्र मेथीचे दर घटले आणि सोबतच वावरात मेथीला फुले येऊ लागली. त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी त्यांनी भाजीपाल्यावरच रोटर फिरवले. आता त्यांनी खरिपातील पीक घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
शेतकऱ्यांना फसवणे पडले महागात; पोलिसांनी जप्त केला लाखोंचा मुद्देमाल
बाजारपेठेतील चित्र
भाजीपाल्याला पावसाळ्यात चांगला दर मिळतो. त्यामुळे देवळा तालुक्यात भाजीपालाचे क्षेत्र वाढत चालले आहे. मात्र ऐन वेळी मेथीचे दर घसरले. अवघ्या
10 रुपयाला अर्धा डझन पेंड्या देण्याची वेळ शेतकरी नारायण गिरासी यांच्यावर आली होती. त्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.
महत्वाच्या बातम्या:
एक आमदार असाही! पाण्यासाठी मंत्रीपद नाकारले, पण लोकांना पाणी दिलेच..
शेतकऱ्यांनो ट्रॅक्टर खरेदीवर मोदी सरकार देतंय 50 टक्के अनुदान; आजच घ्या लाभ
Published on: 17 June 2022, 01:53 IST