टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना कधी टोमॅटो रोडवर फेकावा लागतो, तर कधी तो मालामाल करतो. गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर कोसळले असताना आता मात्र ज्यांचा टोमॅटो आहे, ते शेतकरी मालामाल होणार आहेत. याचे कारण म्हणजे टोमॅटोचे दरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. यामुळे दिलासा मिळाला आहे.
सध्या मुंबईत बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या दराने 80 रुपये किलोचा टप्पा ओलांडला आहे. तसेच किरकोळ बाजारात देखील टोमॅटोचे दर 90 ते 100 रुपये झाले आहे. यामुळे आता टोमॅटो परवडत नाही. या दरवाढीचे कारण म्हणजे उन्हाळ्यामुळे अनेक ठिकाणी टोमॅटोची रोपटे जळाली होती.
यामुळे उत्पादनात मोठी घट झाली होती. पीक खराब झाल्यामुळे टोमॅटोचे उत्पन्न घटल्यामुळे टोमॅटोला चांगलाच भाव मिळत आहे. सध्या बाजारात टोमॅटोचे कॅरेट 1100 रुपयापर्यंत मिळत असून, किरकोळ बाजारात टोमॅटो 80 रुपये प्रती किलो प्रमाणे विक्रीसाठी उपलब्ध आहे. यामुळे शेतकरी समाधानी आहेत, तर खरेदी करणारांची अडचण निर्माण झाली आहे.
योगी सरकारचा मोठा निर्णय! घरातील एका सदस्याला मिळणार नोकरी, जाणून घ्या योजना
दक्षिणेतील काही राज्यांना महाराष्ट्रातून टोमॅटो ची पुरवणी केली जाते. यामुळे सध्या अनेक ठिकाणी पुरवठा देखील कमी होत आहे. 15 दिवसांपासून कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडूत टोमॅटोची कमतरता झाली आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातातून अनेक गाड्या त्याठिकाणी जात आहेत.
टोमॅटोला जास्त मागणी असल्यामुळे टोमॅटोचे भाव वधारले आहे. टोमॅटोच्या दारात अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शाळा अजूनही बंद आहेत त्या सुरू झाल्यावर यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी सध्या समाधानी आहेत.
महत्त्वाच्या बातम्या;
श्रीलंकाच नाही तर इतर ६९ देशही आहेत कंगाल, या गोष्टी आल्या अंगलट, जाणून घ्या..
ऐतिहासिक शेतकरी संपाच्या गावात ठरली रणनीती, 7 दिवसाचा अल्टिमेटम, अन्यथा पुन्हा पेटणार आंदोलनाची मशाल
शेतकऱ्यांनो तापमानवाढीचा पशुधनावरील दुष्परिणाम, आणि उपाय जाणून घ्या
Published on: 24 May 2022, 03:00 IST