सध्या रब्बी हंगामातील ज्वारी, गहू तसेच इतर पिके काढणीला आली आहेत. यामुळे पक्षांपासून त्या पिकांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. नाहीतर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होणार आहे. सध्या या शिवारात सकाळ आणि संध्याकाळीच पक्षांचा चिवचिवाट सुरु आहे. पक्षांचे थवे येऊन थेट ज्वारीच्या कणसावर येऊन बसतात. यामुळे शेतकरी धडपड करत आहेत. अनेक शेतकरी गोफण, बुजगावणं याचे प्रयोग करत असतात.
आता वाशी जिल्ह्यातील ढोणी गावच्या शेतकऱ्याने पीक संरक्षणासाठी असे काय जुगाड लावले आहे की ज्वारी, हायब्रीड याचा एक दाणाही पक्षांच्या तोंडी जाणार नाही. यामुळे सध्या या शेतकऱ्याची चर्चा सुरु आहे. एका ठिकाणी बसून दोन एकरातील पिकांचे संरक्षण ते सहज करु शकत आहेत. ढोणी गावचे गजानन शेळके यांनी हे करून दाखवले आहे.
यामुळे पिकाची नासाडी टळलेली असून उत्पादनातही भर पडणार आहे. पिकांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी घरातील पाण्याच्या हंड्याचा वापर केला आहे. दोन एकरातील क्षेत्रामध्ये बांबूच्या सहायाने हांडे बांधले आहेत. या हंड्यामध्ये बारिक दगड टाकून ते कापडाच्या सहाय्याने बंद केले आहे. एका एकरात किमान 4 ते 5 ठिकाणी असे करुन सर्व हांड्याचे दोर स्वत:कडे ठेऊन ते सातत्याने हालवत आहेत.
या आवाजामुळे पक्षी याठिकाणी फिरकत नाहीत. शिवाय एकाच जागेवरुन ते पिकाचे संरक्षण करु शकत आहेत. यासाठी काही खर्च नाही. तसेच एका ठिकाणी सावलीत बसून ते पिकांचे संरक्षण करु शकतात. यामुळे हा उपाय फायदेशीर ठरत आहे. सध्या खरीप हंगामात न भरुन निघणारे नुकसान झाले होते पण रब्बी हंगामातून शेतकऱ्यांच्या पदरी चार पैसे पडतील अशी आशा आहे.
यामुळे अंतिम टप्प्यात नुकसान होऊ नये म्हणून अशा पध्दतीने पिकांचे संरक्षण केले जात आहे. यामुळे हा जुगाड फायदेशीर ठरत आहे. अनेक शेतकरी सध्या आपल्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी आपल्या शेतात व्यस्त आहेत. यामुळे त्यांचा मोठ्या प्रमाणावर वेळ हा यामध्येच जात आहे.
महत्वाच्या बातम्या;
बातमी कामाची! आता गोवंश पालन करण्यासाठी सरकार देणार 25 लाखाचे अनुदान
काहीही करा पण ऊस तोडा गड्यांनो! आता ऊस तोड मजुरांना प्रतिटन 50 रुपये वाढीव रक्कम
मोफत रेशन! 6 महिन्यांसाठी मोफत रेशनची घोषणा, मोबाईल OTP वरून मिळवा रेशन..
Published on: 04 April 2022, 03:07 IST