News

नाशिक: नाशिक जिल्ह्यातून कांदा व्यापाऱ्यांचा मनमानीपणा जग जाहीर झाला आहे. नाशिक जिल्हा कांद्याच्या उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. जिल्ह्यातील कळवण सटाणा मालेगाव देवळा या तालुक्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. सध्या जिल्ह्यात खरीप हंगामातील व रांगडा कांद्याची आवक होत असून थोड्याफार प्रमाणात उन्हाळी कांद्याची आवक होत आहे.

Updated on 27 March, 2022 5:23 PM IST

नाशिक: नाशिक जिल्ह्यातून कांदा व्यापाऱ्यांचा मनमानीपणा जग जाहीर झाला आहे. नाशिक जिल्हा कांद्याच्या उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. जिल्ह्यातील कळवण सटाणा मालेगाव देवळा या तालुक्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. सध्या जिल्ह्यात खरीप हंगामातील व रांगडा कांद्याची आवक होत असून थोड्याफार प्रमाणात उन्हाळी कांद्याची आवक होत आहे.

कसमादे पट्ट्यातील बाजार समित्यात रांगडा व लाल कांदा मोठ्या प्रमाणात येत असून कांद्याची मोठी आवक होत आहे. कसमादे पट्ट्यातील सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका शेतकऱ्याने आणलेल्या कांद्यास केवळ 555 रुपये प्रति क्विंटल एवढी बोली लागली विशेष म्हणजे हा कांदा चांगल्या दर्जाचा होता तरीदेखील कांद्याला अतिशय कवडीमोल दर मिळाला. हाच कांदा शेतकऱ्याने देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी नेला असता तिथे या कांद्याला 805 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला. यामुळे शेतकऱ्यांकडून बाजार समिती विरुद्ध तसेच व्यापाऱ्यांविरुद्ध मोठा संताप व्यक्त केला जात आहे.

मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा जास्त काळ साठवता येणे अशक्य असल्याने शेतकरी बांधव कांदा काढणी झाल्यानंतर लगेच बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल होत आहेत. त्यामुळे कांद्याच्या आवक मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण देखील बघायला मिळत आहे. मात्र, चांगल्या दर्जाच्या कांद्याला बाजारपेठेत सध्या जो दर चालू आहे त्यापेक्षाही कमी किमतीत कांद्याला बोली लागल्यामुळे कांदा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची हुकूमशाही लोकांसमोर आली असून सुलतानी दडपशाहीमुळे शेतकरी कशा पद्धतीने भरडला जातो याचे जिवंत उदाहरण बघायला मिळत आहे.

त्याचं झालं असं, शेतकरी रमेश वाघ यांनी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्रीसाठी आणला होता. रमेश यांनी आणलेला कांदा चांगल्या दर्जाचा असूनही  सटाणा एपीएमसीमध्ये या कांद्याला मात्र 555 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला. त्यामुळे रमेश यांनी त्यांच्यासमवेत असलेल्या विंचूर येथील शेतकरी भाऊसाहेब गायकवाड यांच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संपर्कप्रमुख कुबेर जाधव यांच्याकडे याबाबत तक्रार केली.

यावेळी जाधवांनी तोच कांदा देवळा एपीएमसी मध्ये विक्रीसाठी आणा असे आवाहन केले. जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे रमेश यांनी आपला कांदा देवळा एपीएमसीमध्ये विक्रीसाठी नेला. त्याच कांद्याला देवळा एपीएमसीमध्ये 805 रुपये प्रति क्‍विंटल असा दर देण्यात आला. यामुळे एकाच कांद्याला दोन बाजार समितीमध्ये मिळत असलेल्या बाजार भावात मोठी तफावत असल्याचे उघडकीस आले यामुळे सदर प्रकरणात कांदा उत्पादक शेतकरी मोठे आक्रमक आहेत.

एकंदरीत या प्रकरणावरून शेतकऱ्यांची कशी कोंडी केली जाते हे उघड झाले आहे. याबाबत कांदा उत्पादक शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सटाणा एपीएमसी मध्ये निवेदन देखील दाखल केले आहे. याशिवाय संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सटाणा यांची भेट घेऊन या प्रकरणाबाबत माहिती दिली. यावर सहाय्यक निबंधक शेळके यांनी लवकरच एक संयुक्त बैठक घेऊ असे आश्वासन दिले आहे. आता ही संयुक्त बैठक कधी पार पडते आणि यावर काय कारवाई होते हे विशेष बघण्यासारखे राहील.

संबंधित बातम्या:-

मोठी बातमी! कांद्याच्या दरात मोठी घसरण म्हणून केंद्रीय मंत्री भारती पवार यांना पत्र, निघेल का यावर तोडगा?

शेतकरी पुत्राची कमाल! कसा एका शेतकऱ्याचा पोरगा अरबपती होतो? वाचा शेतकरी पुत्राची यशोगाथा

शेतकऱ्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग! ड्रॅगन फ्रुटचे घेतले यशस्वी उत्पादन; लाखो रुपये उत्पन्नाची आशा

English Summary: Different prices for the same onion in two market committees, arbitrariness of traders
Published on: 27 March 2022, 05:23 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)