News

जून महिन्यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची 47 बैठक संपन्न झाली. यामध्ये विविध प्रकारच्या वस्तूंवर जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर लावण्याबाबत बैठकीमध्ये अनेक प्रकारचे निर्णय घेण्यात आले होते.

Updated on 10 July, 2022 12:17 PM IST

जून महिन्यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची 47 बैठक संपन्न झाली. यामध्ये विविध प्रकारच्या वस्तूंवर जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर लावण्याबाबत बैठकीमध्ये अनेक प्रकारचे निर्णय घेण्यात आले होते.

तसेच आजवर करमुक्त असलेल्या अशा अनेक वस्तू जीएसटीच्या कक्षेत आणण्यासही जीएसटी परिषदेने सहमती दर्शवली.

आधीच महागाईचे चटके सहन करणाऱ्या सामान्यजनांना या निर्णयामुळे झटका बसणार असून त्यांच्या महिन्याच्या एकंदरीत आर्थिक बजेट मध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे.

जीएसटी परिषद झाल्यानंतर 19 जून रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत महसूल सचिव तरुण बजाज यांनी सांगितले की, वस्तू वरील जीएसटी चे नवे दर 18 जुलैपासून लागू होतील.

18 जुलै नंतर जीएसटी चे नवे दर लागू झाल्यानंतर कोणती गोष्ट महाग होतील ते आपण पाहू.

नक्की वाचा:शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा! शेतकऱ्यांना मोठा दिलासा..

18 जुलैपासून महाग होतील 'या' गोष्टी

1- टेट्रापॅक केलेले दही, लस्सी आणि बटर मिल्कवर 18 जुलैपासून पाच टक्के जीएसटी लागणार आहे. या वस्तू अगोदर जीएसटीच्या कक्षेत नव्हत्या.

2- तुम्ही बँकेकडून चेकबुक जर घ्यायला जाल तरी बँकाकडून आकारले जाणारे शुल्क आता 18% जीएसटी लागू करून आकारले जाईल.

नक्की वाचा:ठाकरे सरकारच्या निर्णयाला धक्का! जलसंधारणाची 5 हजार कोटींची कामे शिंदे सरकारने केली रद्द

3- 5000 रूपयांपेक्षा जास्त भाड्याने( नॉन-आयसीयू) रुग्णालयांना आता पाच टक्के कर भरावा लागणार.

4- जीएसटी कौन्सिलने हॉटेल्सने दर दिवशी एक हजार रुपयांपेक्षा कमी भाड्याने दिलेल्या खोल्यांवर 12 टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला आहे. जे आतापर्यंत जीएसटीचा कक्षेबाहेर होते.

5- एलईडी बल्ब, एलईडी दिव्यावरील जीएसटी 12 टक्क्यांवर 18 टक्के करण्यात आला आहे.

6- ब्लेड, कागदी कात्री, पेन्सिल शॉर्पनर, चमचे, काटे असलेले चमचे, स्किमर आणि केक सर्वर्स इत्यादींवर आता बारा टक्‍क्‍यांऐवजी 18 टक्के दराने जीएसटी लागू होईल.

नक्की वाचा:महावितरणचा नागरिकांना शॉक: महावितरणने वीज दरात केली मोठी वाढ, जाणून घेऊ नवीन दर

English Summary: Curd,bank checkbook and other some thing expensive from 18 july
Published on: 10 July 2022, 12:17 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)