Crop Insurance: शेतपिकाचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना भरपाई मिळावी म्हणून १ एप्रिल २०१६ साली पंतप्रधान पीकविमा योजना सुरू करण्यात आली. खरीप हंगामातील पिकासाठी शेतकऱ्यांना २ टक्के विमा रक्कम भरावी लागते तर रब्बी हंगामासाठी १.५ टक्के रक्कम भरावी लागते. मात्र आतापर्यंत पीक विम्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होण्याऐवजी विमा कंपन्याच हजारो कोटी रुपये नफा मिळवला.
विमा कंपन्यांनी यातून दरवर्षी तब्बल ५ हजार कोटी रुपयांच्या घरात नफा कमावल्याचे दिसून येते. नैसर्गिक आपत्तीच्या काळात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पीकविमा कंपन्या हजारो कोटी रुपयांचा नफा कमवत असतानाही शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई दिली जात नाही.
रिलायन्स इन्शुरन्स आणि भारतीय कृषी विमा या दोन कंपन्यांनी सर्वाधिक नफा कमावला आहे. या नफेखोरीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावाही केला होता. मात्र यात कोणताही बदल झालेला नाही.
हेही वाचा: ''विठ्ठल हा सामान्य माणसांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा देव''
२०१६-१७ या आर्थिक वर्षात ५ कोटी ८३ लाख शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नोंदणी केल्यानं २१६९७ कोटी रुपयांची विमा रक्कम जमा झाली. नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना १६८०७ कोटी रुपये देण्यात आले.
२०१७-१८ मध्ये ५ कोटी ३२ लाख लाख शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली. विमा कंपन्यांकडे २४५९७ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली त्यापैकी त्या वर्षी शेतकऱ्यांना २२१४२ कोटी रुपये देण्यात आले.
२०१८-१९ मध्ये ५ कोटी ८० लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला. त्यामुळे विमा कंपन्यांकडे २९६९३ कोटी रुपये जमा झाले. त्यापैकी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या दाव्याचा परतावा म्हणून २८४६४ शेतकऱ्यांना देण्यात आले.
हेही वाचा: मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही : कृषिमंत्री अब्दुल सत्तार
२०१९-२० मध्ये पीक विमा योजनेत सहभाग घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली. ६ कोटी २४ लाख शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवल्यानं ३२३४० कोटी रुपये विमा कंपन्यांना मिळाले त्यापैकी परतावा म्हणून शेतकऱ्यांना २६४१३ कोटी रुपये देण्यात आले.
२०२०-२१ या आर्थिक वर्षात ६ कोटी २३ हजार शेतकरी पीक विमा योजनेत सहभागी झाले. विमा कंपन्यांना यामुळं ३१८६१ कोटी रुपये मिळाले. त्यापैकी शेतकऱ्यांचे १७९३१ कोटी रुपयांचे दावे मंजूर करण्यात आले. २०२१-२२ मध्ये पीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या केवळ खरीप हंगामातील आहे.
अनेक राज्य या योजनेतून बाहेर देखील पडली आहेत. ४ कोटी ९८ लाख शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवला. पीक विमा रक्कम म्हणून १८९४४ कोटी रुपयांची रक्कम विमा कंपन्यांकडे जमा झाली. त्यापैकी शेतकऱ्यांच्या नुकसानाचा परतावा म्हणून ७५५७ कोटी रुपये देण्यात आले.
हेही वाचा: बेरोजगार मजुरांसाठी सरकार देणार 5000 रुपये; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
हेही वाचा: धडाकेबाज कारवाई! पंचनाम्यासाठी पैसे मागितल्याप्रकरणी कृषी सहायक, ग्रामसेवक निलंबित
Published on: 04 November 2022, 11:13 IST