सध्या शेतकरी अनेक अडचणींचा सामना करत आहे. यासाठी शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रही भूमिका घेत तातडीने सर्व वीजजोडण्या पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, शासनाच्या प्रत्येक योजना शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचतात अथवा नाही हे प्रत्यक्ष जाऊन पाहणे लोकप्रतिनिधींचे काम आहे. यासाठी बैठकांचे आयोजन करण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले. याशिवाय सौरपंप योजनेसाठी जागरूकता निर्माण करण्याचे सांगितले.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आवास योजना, भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याबाबतची सद्यःस्थिती, स्वच्छ भारत अभियान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसामुंडा कृषी क्रांती योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत नवीन विहिरींचे वाटप याचा आढावा घेतला.
यावेळी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर वितरीत करण्यात आले. इंडो इस्राईल प्रकल्पांतर्गत नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्याच्या तेलगाव येथील ऊर्मिला राऊत यांना आणि कृषी यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील अजनी येथील रामदास उमाटे यांना ट्रॅकर देण्यात आला.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सर्वांचे अंदाज चुकवत मान्सून अंदमानसह बंगालच्या उपसागरात दाखल..
दरम्यान, अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली. आता पावसाळ्यात पाऊस कसा पडतोय याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.
मोठी बातमी! बाबाराजे देशमुखांना पोलिसांकडून अटक, धक्कादायक माहिती आली समोर..
ज्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत, त्यांनाही मिळणार! फक्त या शेतकऱ्यांना पुढचा हप्ता मिळणार नाही
आता रेशनकार्ड काढता येणार ऑनलाइन, एजंटची कटकट मिटली
Published on: 22 May 2023, 09:44 IST