राज्यात सध्या उष्णतेची तीव्र लाट आली आहे. तापमान जवळपास ४२ अंश सेल्सिअस ते ४७ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. या उष्णतेचा परिणाम शेतातील पिकांवर होत आहे. विशेषतः याचा फटका फळबागांवर मोठ्या प्रमाणात होत आहे.अति उष्णतेमुळे फळांचा दर्जा कमी होत आहे. परिणामी बाजारात याला कमी भाव मिळतो. त्यातून शेतकरी बंधूंचे आर्थिक आणि शारीरिक श्रम देखील वाया जाते.
यावर तोडगा म्हणून राष्ट्रीय किसान परिषदेचे अध्यक्ष अशोक पाटील-हुड यांनी नुकसानग्रस्तांना हेक्टरी २ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. राष्ट्रीय किसान परिषदेचे अध्यक्ष अशोक पाटील-हुड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पंतप्रधान कार्यालयाचे मुख्य अनुपालन अधिकारी अमित मालवीय यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे. ज्याप्रमाणे आपण उद्योगांना कार्बन क्रेडिट देतो. असाच न्याय शेतकऱ्यांना ही तुम्ही द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
राज्यात एप्रिल व मे महिन्यात उष्णतेची लाट तीव्र झाली असून तापमान जवळजवळ ४२ अंश सेल्सिअस ते ४७ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. त्यामुळे केळी अवेळी पिकणे, आंबा ईजळने, मोसंबीची फळगळ होऊन झाडे मरणे, डाळिंब फुटणे, तसेच पेरू व पपई आतून काळी पडणे अशाप्रकारचा गंभीर परिणाम हा फळबागांवर होत आहे.
२० जूनला होणार संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान
मध्यंतरी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे हंगामी पिकांसोबत फळबागांचे देखील बरेच नुकसान केले होते. आणि आता अतिउष्णतेमुळे पिकांचे नुकसान होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर हे दुहेरी संकट ओढावले गेले आहे. तापमानात वाढ झाल्याने फळबाग धारकांचे किमान १० हजार कोटींचे नुकसान झाले आहे. तरी या शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
'या' सरकारी योजनेत 2 लाख गुंतवणूक करून मिळवा 4 लाख; वाचा याविषयी
Medicinal Plant : 15 हजार रुपये गुंतवणूक करून सुरु करा या औषधी वनस्पतीची शेती आणि कमवा 3 महिन्यात 3 लाख
Published on: 11 May 2022, 09:58 IST