News

सध्या अवकाळी पावसाला पोषक असे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे मोठे नुकसान होत आहे. पुण्यात आज काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.

Updated on 08 May, 2023 4:14 PM IST

सध्या अवकाळी पावसाला पोषक असे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे मोठे नुकसान होत आहे. पुण्यात आज काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.

कालपासून पुण्यात पावसाला पुन्हा सुरुवात झाली. पुण्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे पुढील चार दिवस महत्वाचे आहेत. पुण्यात रविवारी सायंकाळनंतर झालेल्या पावसामुळे पुणेकरांच्या सुट्टीची धांदल उडाली.

काही वेळातच रस्ते पाण्याखाली गेले. हडपसरमध्ये काल १३.५ मिमी एवढा पाऊस नोंदवला गेला. तर एनडीए १ मिमी, लोणावळा १, शिवाजीनगर ०.५, मगरपट्टा ०.५, हवेली ०.५ पावसाची नोंद झाली. उन्हाळ्यात दुपारी प्रचंड उकाडा आणि सायंकाळी पाऊस हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून पुणेकरांना अनुभवता येत आहे.

बारामतीच्या अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचा आर्टिफिशियल इंटेलिजेंस मधील संशोधनाबाबत सामंजस्य करार

हवामान बदलल्याचा हा फटका असल्याची चर्चा केली जात आहे. येत्या तीन-चार तासांमध्ये पुणे शहरासह राज्यातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, अहमदनगर, सातारा, धाराशिव, सिंधुदुर्ग येथेही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

गाळप परवाना उल्लंघन प्रकरणी राज्यातील 22 कारखान्यांना दणका! कोटींचा झाला दंड...

तसेच ग्रामीण भागात शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गारपीट देखील होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

अतिवृष्टीचा पंचनामा करण्यास नकार, कृषीमंत्र्यांनी थेट निलंबनच केलं..
आता मजुरांनाही मिळणार विम्याचा लाभ, जाणून घ्या...
गाळप परवाना उल्लंघन प्रकरणी राज्यातील 22 कारखान्यांना दणका! कोटींचा झाला दंड...

English Summary: Chance of rain with strong wind in Pune! The next four days are important
Published on: 08 May 2023, 04:14 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)