News

बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने राज्यातील ऊसदराची कोंडी फोडली आहे. सन २०२२-२३ या सालात गाळप झालेल्या उसाला तब्बल ३ हजार ३५० रुपये दर जाहीर केला आहे.

Updated on 10 August, 2023 8:04 AM IST

बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने राज्यातील ऊसदराची कोंडी फोडली आहे. सन २०२२-२३ या सालात गाळप झालेल्या उसाला तब्बल ३ हजार ३५० रुपये दर जाहीर केला आहे.

गेल्या वर्षीच्या ऊसदराची कोंडी फोडत हा दर देणारा सोमेश्वर कारखाना हा राज्यातील पहिला कारखाना ठरला असल्याचे कारखाना प्रशासनाने सांगितले. यामुळे शेतकरी देखील समाधानी आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रति मे. टन ३३५० रु. ऊसदर जाहीर केला असून संपुर्ण राज्यात एफआरपीपेक्षा प्रति मे. टन ५०० रुपये जास्त दर देणारा सोमेश्वर कारखाना राज्यातील क्रमांक एकचा कारखाना राहिला आहे.

गोकुळकडून जनावरांच्या लम्पी आजाराकडे, गोकुळचे चेअरमन, संचालकांना दौरा सोडून जाण्याची वेळ..

नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये या सर्वोच्च ऊसदरावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. सोमेश्वर कारखान्याने गेल्या वर्षी तुटून गेलेल्या उसाला २ हजार ८४६ रुपये एफआरपी दिली होती.

यामध्ये संचालक मंडळाने टनाला ५४ रुपयांची अधिकची भर टाकून सभासदांना २ हजार ९०० रुपये अदा केले होते. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांना अजून टनाला ४५० रुपये मिळणार आहेत.

आता सातबारा उताऱ्यावर आता महिलेचेही नाव, लक्ष्मी योजनेची झाली सुरुवात...

असे असताना मात्र यामधून लवकरच होऊ घातलेल्या सर्वसाधारण वार्षिक सभेत सभासदांची परवानगी घेत शिक्षण निधी व परतीची ठेव कपातीची शक्यता नाकारता येत नाही. सोमेश्वर कारखान्याने गेल्या हंगामात १२ लाख ५६ हजार ७६८ मे. टनाचे गाळप केले असून सरासरी ११.९२६ टक्के साखर उतारा राखीत १४ लाख ६७ हजार ९५० साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे.

टोमॅटोच्या शेतात शेतकऱ्याने बसवले सीसीटीव्ही कॅमेरे, टोमॅटोची चोरी होऊ नये म्हणून लढवली शक्कल..
जप्त केलेली वाळू घराकुलासाठी मोफत वाटप, महसूल विभागाचा निर्णय..
चंद्रशेखर राव उद्या इस्लामपूरममध्ये! आठवड्यात दुसरा दौरा असल्याने चर्चा सुरू, रघुनाथदादा यांची शेतकरी परिषद होणार..

English Summary: Cane price dilemma broke out! The factory owned by Ajitdada paid highest price in state,
Published on: 10 August 2023, 08:04 IST