News

शेतकरी त्यांच्या मागण्यांसाठी अनेक प्रकारे आंदोलन करतो. मात्र आता एका शेतकऱ्याने असे आंदोलन केले आहे त्यामुळे या शेतकऱ्याची चांगलीच चर्चा सुरू आहे. आई, मावशीला जमिन मिळावी म्हणून स्वतःला या शेतकऱ्याने जमिनीत गाडून घेतले आहे.

Updated on 03 January, 2023 12:46 PM IST

शेतकरी त्यांच्या मागण्यांसाठी अनेक प्रकारे आंदोलन करतो. मात्र आता एका शेतकऱ्याने असे आंदोलन केले आहे त्यामुळे या शेतकऱ्याची चांगलीच चर्चा सुरू आहे. आई, मावशीला जमिन मिळावी म्हणून स्वतःला या शेतकऱ्याने जमिनीत गाडून घेतले आहे.

याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जालना जिल्ह्यातील हलस याठिकाणी ही घटना घडली आहे. जालन्यातील मंठा तालुक्यातील हेलस या गावात हे आंदोलन करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेअंतर्गत आई आणि मावशीला मिळालेल्या जमिनीचा ताबा मिळण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. सुनील जाधव असे या शेतकऱ्याचे नाव आहे. 

लग्नात वाजवले फटाके आणि उसाला लागली आग, ६ लाखाचे नुकसान..

जाधव यांच्या आई आणि मावशीला प्रत्येकी 1 हेक्टर 35 आर जमीन मंजूर झालेली आहे. मात्र, असे असतानाही या जमिनीचा अजूनही ताबा मिळालेला नाही. यामुळे ते नाराज झाले. यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.

तीतर पालनातून करा लाखोंची कमाई, शेतकऱ्यांसाठी आहे फायदेशीर..

अनेकदा पाठपुरावा करूनही त्यांना जमीन ताब्यात मिळत नसल्याने शेतकऱ्याने अखेर स्वतःला जमिनीत गाडून घेतले. त्यांनी प्रशासन आणि शासनाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आता त्यांना न्याय मिळणार का हे लवकरच समजेल.

महत्वाच्या बातम्या;
उगीच कोणी शेतकरीराजा म्हणत नाही!! शेतकरी घालतोय हार्ले डेव्हिडसनवर दूध, बघणारे गेलेत कोमात
शेतकऱ्यांचे 100 टन उसाचे उत्पन्न बघून शरद पवारांनी लावला थेट वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला फोन आणि...
गरिबांना मोफत रेशन देण्याचा केंद्राचा निर्णय, 81 कोटी नागरिकांना होणार फायदा

English Summary: Burying himself ground possession land, unique movement of the farmer
Published on: 03 January 2023, 12:46 IST