News

हमीभाव कायद्याचं महत्व ओळखून या कायद्यासाठी देशभरातील शेतकऱ्यांमध्ये जनजागृती सुरू करण्यात आली आहे.

Updated on 12 May, 2022 10:00 AM IST

kolhapur : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ईशान्येकडील राज्यांमध्ये आजपासून हमीभावाचा कायदा करावा यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी ‘एमएसपी गॅरंटी किसान मोर्चा’च्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. शेतकऱ्यांसाठी हमीभाव कायदा अत्यंत महत्वाचा आहे.

कारण हमीभाव या प्रणालीच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल एका ठराविक किंमतीत खरेदी करण्याची हमी देत असतं. या अंतर्गत सरकार सध्या 23 शेतमालांची खरेदी करते. यामध्ये प्रामुख्याने गहू, ज्वारी, सोयाबीन, बाजरी, मका, शेंगदाणा, मूग, तीळ आणि कापूस आदी पिकांचा समावेश आहे.
यामध्ये सरकार शेतकऱ्याच्या शेतमालाच्या खरेदीचे दर जाहीर करतं आणि त्यानंतर सरकारी खरेदी केंद्रांवर या शेतमालाची खरेदी केली जाते.


यामागचा मुख्य उद्देश म्हणजे, जर बाजारात शेतमालाच्या किंमतीत घसरण झाली, तरी देखील केंद्र सरकार ठरवलेल्या हमीभावानेच शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करणार यातून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टळेल. या हमीभाव कायद्याचं महत्व ओळखून या कायद्यासाठी देशभरातील शेतकऱ्यांमध्ये जनजागृती सुरू करण्यात आली आहे. ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम, नागालँड, सिक्कीम व त्रिपुरा या राज्यांतील शेतकरी प्रश्‍नांवर चर्चा होणार आहे.

उन्हाळ्यात लिंबूला भाव असतो, पण इतर वेळी जास्त भाव नसतो त्यामुळे लिंबू प्रक्रिया उद्योगाला द्या महत्व

शिलाँग येथे आठ राज्यांतील शेतकरी नेत्यांच्या उपस्थितीत शेतकरी प्रश्‍नांवर बैठक होणार आहे. तसेच मेघालय येथे पहाडी शेतकरी संघटनेच्या वतीने मलकी ग्राउंड या परिसरात सभा व रॅली आयोजित करण्यात आली आहे. देशातील शेतकरी संघटनांनी राजू शेट्टी आणि व्ही. एम. सिंग यांच्या नेतृत्वाखाली ‘एमएसपी गॅरंटी किसान मोर्चा’ची स्थापना केली आहे. केंद्र सरकारने तातडीने हमीभावाचा कायदा करावा यासाठी या मोर्चाची स्थापना करण्यात आली आहे.

सध्या महाराष्ट्रात १५ एप्रिलपासून ‘बळीराजा हुंकार यात्रा’ सुरू आहे. आणि आता ईशान्येकडील राज्यांमध्ये लक्ष केंद्रित केले आहे. त्रिपुराच्या पूर्वेला आसाम आणि मिझोराम या भारतीय राज्यांत तांदूळ, नाचणी, ज्वारी, मका आणि कडधान्ये ही प्रमुख पिके आहेत. तसेच तेलबिया आणि नगदी पिकांसह काजू, नारळ, सुपारी, वेलची, मिरची, कापूस, ऊस व तंबाखू ही पिके देखील आहेत. आता ईशान्य भारतातील शेतकऱ्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! सोलर पंप बसवण्यासाठी मोदी सरकार देणार 60% अनुदान 
सॉईल सोलरायझेशन! जमीन नांगरून चांगली तापू देणे पिक उत्पादन वाढीसाठी आहे महत्त्वाचे
Maize Farming: या खरीप हंगामात मक्याची शेती शेतकऱ्यांना करणार मालामाल; कारण की….. 

English Summary: Breaking: Swabhimani Sanghatana: Awareness of Guarantee Act will now be heard all over the country
Published on: 12 May 2022, 10:00 IST