राज्यात सत्तांतर झाले आणि अनेक घडामोडी घडल्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अध्यक्ष असलेली कुस्तीगीर संघटना बरखास्त करण्यात आली. यामुळे राष्ट्रवादीसाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय. असे असताना आता ही संघटना ताब्यात घेण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
आता याच महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपचे खासदार रामदास तडस (Ramdas Tadas) मैदानात आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी खासदार तडस आज उमेदवारी अर्ज भरत आहेत. यामुळे संपूर्ण राज्याचे याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान शरद पवार यांचे वजन असलेल्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपचा हा प्रयत्न आहे, यामुळे हे मैदान होणार मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार हे यावर अध्यक्ष म्हणून काम बघत होते. भाजप खासदार बृजभुषण सिंग (bjp mp brijbhushan singh) हे शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि भारतीय कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत. बृजभुषण सिंग यांनी अध्यक्षांच्या बरखास्तीची कारवाई त्यावेळी केली होती. यामुळे पवारांना हा एक मोठा धक्का मानला जात होता
खर की काय! गाई- म्हशींना मीठ दिल्यास वाढती दुधाची क्षमता? वाचा तज्ञांची प्रतिक्रिया
याबाबत शरद पवार म्हणाले होते की, क्रीडा क्षेत्राला खासगी किंवा सरकारी मदत मिळवून देणे हे माझे आहे. मी अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप केला नाही. अनेक खेळाडूंना मी मदत केली, हे मी आजपर्यंत कधी सांगितले नाही. यामध्ये राहुल आवारे, अभिजीत कटके, उत्कर्ष काळे, किरण भगत अशी अनेक नावे आहेत. अनेकांना वैद्यकिय आर्थिक मदत मी केली आहे, असेही ते म्हणाले.
एक नंबर! अवघ्या २९९ रुपयांत तब्बल १० लाखांचा विमा, वाचा सविस्तर..
दरम्यान, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रामदास तडस यांनी काँग्रेसच्या सागर मेघे यांचा 2 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता. संपूर्ण मेघे कुटुंबीयाने भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामुळे आता काय होणार याकडे सर्वांचे लागले आहे. अध्यक्षपद घेण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत.
ताज्या बातम्या;
मोठी बातमी! अनेक राजकीय घडामोडींनंतर दिनेश गुणवर्धने बनले श्रीलंकेचे पंतप्रधान
ब्रेकिंग! प्रसिध्द बांधकाम व्यावयसायिक डी. एस. कुलकर्णी यांना जामीन मंजूर
दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा, एकमेकांवर बॉम्ब फेकले, राजकीय वातावरण तापले..
Published on: 22 July 2022, 03:12 IST