गेल्या काही दिवसांमध्ये अनेक आमदारांचे अपघात होत आहेत. यामुळे याची चर्चा सुरू असताना आता प्रहार संघटनेचे नेते माजी मंत्री बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. रस्ता ओलांडताना दुचाकीने बच्चू कडू यांना धडक दिली आहे. या अपघातात बच्चू कडू गंभीर जखमी झाले आहेत.
यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आज सकाळी अमरावतीत सहा ते साडेसहाच्या दरम्यान बच्चू कडू रस्ता ओलांडत होते. तेव्हा एका दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली.
या धडकेत बच्चू कडू गंभीर जखमी झाले. त्यांना अमरावतीमध्ये खाजगी रुग्णालयात बच्चू कडू यांच्यावर उपचार सुरु असून, डोक्याला, हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. यामुळे कार्यकर्ते चिंतेत आहेत.
'लॅाकडाऊनमध्ये अडचणीत सापडलेल्या पॅालिहाऊस ग्रीनहाऊस शेतकऱ्यांना एक रक्कमी कर्ज परतफेड योजना राबवा'
याबाबत त्यांनी स्वतः फेसबुक पोस्ट करून माहिती दिली असून काळजी करण्याचे कारण नसल्याचे देखील म्हटले आहे. बच्चू कडू यांच्या डोक्याला चार टाके पडले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.
जमिनीची सुपीकता कमी होण्याची कारणे
दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी विनायक मेटे, जयकुमार गोरे, धनंजय मुंडे यांचे अपघात झाले आहेत. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. विनायक मेटे यांचे अपघातामध्ये निधन झाले आहे.
महत्वाच्या बातम्या;
ब्रेकिंग! कारखाना घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची छापेमारी
दर 10 तासाला एका शेतकऱ्याची आत्महत्या! मायबाप सरकार याकडे लक्ष द्या...
आमदारसाहेब लग्नासाठी तुमच्या सर्कलमध्ये पोरगी बघा!! लग्नासाठी मुलगी मिळेना, तरुणाचा थेट आमदाराला फोन...
Published on: 11 January 2023, 12:01 IST