रेल्वे गेटवर बांधलेल्या अंडरपासला ड्रेनेज नसल्यामुळे शेतकऱ्याच्या पिकांचे बरेच नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात ही घटना घडली आहे. ड्रेनेज नसल्यामुळे बाम्हणे कलंबू शिवारात सुमारे १५० एकर शेतीमध्ये पाणी साचून राहिल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी तक्रार देखील दाखल केली आहे. मात्र रेल्वेचे अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. शेवटी संतप्त शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पश्चिम रेल्वेच्या गेट क्रमांक १२६वर रेल्वेतर्फे अंडरपास बोगदा तयार करण्यात आला आहे. या बोगद्याच्या बांधकामाच्या वेळेस ड्रेनेजची कोणतीच व्यवस्था केली नाही. तसेच यासंबंधीची माहिती शेतकऱ्यांना कळू न देता मनमानी पध्दतीने कारभार करत अंडरपास बोगदा बांधला. या बांधकामामुळे शेतकऱ्यांची येण्या-जाण्याची सोय झाली. मात्र शेतांमध्ये पावसाचे पाणी साचू लागल्याने शेकडो एकर शेतीतील पिकांचे नुकसान झाले आहे.
तसेच शेतीत पाणी गेल्याने हाती आलेले उत्पन्नही गेले. श्रमही वाया गेले आणि आर्थिक नुकसानही झाले.या भागात ९० टक्के शेतकऱ्यांनी कापसाची लागवड लागवड केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तत्काळ पाण्याचा निचरा करण्याची मागणी आमदार अनिल पाटील व खासदार उन्मेष पाटील, रेल्वे समितीचे राजेंद्र फडके यांच्याकडे केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशाराही दिला आहे.
Goat Species: रोहीलखंडी,सुमी,कहामी, सालेम काळी 'या शेळ्यांच्या जाती' शेळीपालनात देतील बक्कळ नफा
याबाबत कलंबू ब्राह्मणे शिवारातील चंद्रकांत पाटील, भिकन पाटील, धर्मराज पाटील, प्रवीण पाटील, गोपाळ राजपूत, राजेंद्र राजपूत, शांताराम पाटील, संतोष पाटील, भास्कर पाटील, युवराज पाटील, धनराज पाटील, भाऊसाहेब पाटील, राजेंद्र पाटील, नथू पाटील, रमेश पाटील, प्रभाकर पाटील, विनोद पाटील, रमेश पारधी, मोतीलाल दाभाडे, सुभाष यांनी पश्चिम रेल्वेचे मंडळ अभियंता दिलीपकुमार शुक्ला यांच्याकडे तक्रार केली आहे. नंदुरबार येथील वरिष्ठ अधिकारी नुकसानबाधित शेतीची पाहणी करण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे आता सर्वांचेच या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्याने विहिरीतच घेतला गळफास; शेतकऱ्यांचे प्रश्न सरकार कधी सोडवणार
मूग, उडीद पिकाच्या पेरणीत दिवसेंदिवस होतेय घट; जाणून घ्या कारणं...
Published on: 27 June 2022, 03:48 IST