जनावरांमध्ये उपजतच विषारी वनस्पती ओळखण्याची जाण असल्याकारणाने ते अशा वनस्पती खात नाहीत. परंतु जर जनावर भुकेलेले असेल दुष्काळी भागात चरण्यासाठी मोकळे सोडले असेल, तर अति भुकेमुळे काहीवेळा जनावरे विषारी वनस्पती खातात. सायनाइडचे जास्त प्रमाण हे ज्वारी, सुदान गवत, इंडियन गवत, मका, बाभूळ, ऊस वाढे, जवसाच्या पानात असते.
पानांमध्ये असलेले सायनाइडचे प्रमाण इतर भागांमध्ये असलेल्या सायनाइडच्या प्रमाणापेक्षा जास्त असते वाढीव झाडे तसेच नवीन वाढलेली रोपे यामध्ये सायनाइडचे प्रमाण अत्यंत जास्त असते. वनस्पती चावताना किंवा तुकडे करताना वनस्पतींमध्ये झालेल्या रासायनिक प्रक्रियेमुळे तयार होते. या आम्लाची तीव्रता अत्यंत जास्त असते.
हे जनावरांच्या शरीरात गेल्यास त्याचे गंभीर परिणाम होतात. कोठीपोट रिकामे असताना सायनाइड असलेल्या वनस्पती जनावरांनी खाल्ल्यास विषबाधा कमी होते. जर कोठीपोट भरलेले असेल, तर आधीच उपलब्ध असलेल्या इतर वनस्पतींमध्ये असणाऱ्या उत्प्रेरकांमुळे हायड्रोजन सायनाइड जास्त प्रमाणात तयार होऊन विषबाधा जास्त आढळून येते, जनावर भुकेलेले असते तेव्हा ते चारा जलद गतीने खाते, त्यामुळे हायड्रोजन सायनाइड वायू जास्त प्रमाणात सोडला जातो.
विषबाधेचे निदान अशा प्रकारे होते. श्वासाला कडवट बदामाचा वास. कोठीपाटातील पदार्थांमध्ये हायड्रोसायनिक आम्लाचे प्रमाण तपासणे. विषबाधेच्या लक्षणांवरून तातडीने पशुवैद्यकाशी संपर्क साधून उपचार करावेत. मोठ्या जनावरांना वीस लिटर थंड पाण्यामधून चार लिटर व्हिनेगार दिल्याने रासायनिक प्रक्रिया मंदावून हायड्रोसायनिक आम्लाचे उत्पादन कमी होते. जनावर वाचविण्यास मदत होते.
दुष्काळानंतर झपाट्याने वाढलेल्या झुडपांमध्ये हायड्रोजन सायनाइडचे प्रमाण अत्यंत जास्त असते. त्यामुळे अशा शेतात जनावराला चरण्यास मोकळे सोडू नये.पहिली कापणी करून दुसऱ्यांदा वाढलेल्या झुडपांमध्ये देखील हायड्रोजन सायनाइडचे प्रमाण अत्यंत जास्त असते. नवीन वाढलेली रोपे व वाढीस लागलेली झाडे यामध्ये सायनाइडचे प्रमाण अत्यंत जास्त प्रमाणात असल्याने अशी झुडपे देखील जनावरास खाण्यास देऊ नयेत.
पैसे मिळवून देणारे पीक! लाल-पिवळ्या सिमला मिरचीपासून करा लाखोंची कमाई, जाणून घ्या..
झुडूप १८ ते २४ इंचाच्या वर वाढले असल्यासच जनावरास खाण्यास द्यावे. नवीन चारा असल्यास जनावरांना पहिल्यांदा चरण्यास सोडायचे असल्यास ते दुपारच्या वेळी सोडावे. हायड्रोजन सायनाइडची शंका असल्यास कोणताही चारा कमी प्रमाणात खाऊ घालावा. चारा खाल्ल्यानंतर दोन तासांपर्यंत लक्ष ठेवावे. सायनाइडची शंका असल्यास चाऱ्याची तपासणी करून घ्यावी.
शेतकऱ्यांनो असा कराल खतांचा कार्यक्षम वापर, जाणून घ्या..
दोन टप्प्यातील FRP चा कायदा मागे घेऊन FRP एकाच टप्प्यात करू, मुख्यमंत्र्यांची घोषणा
आयटीमधला जॉब सोडून हे दांपत्य करतंय शेती, शेंगांची पावडर विकून करतात लाखोंची कमाई...
Published on: 17 June 2023, 12:39 IST