News

ज्वारीचे कोढार म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख आहे. ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन हे राज्यातील सोलापूर, बीड, लातूर, आणि उस्मानाबाद जिल्ह्यात होते. परंतु ज्वारी काढणी, काढणी, मशागत, मळणी अशा कष्टाच्या कामांसाठी मजूर उपलब्ध होत नाहीत.

Updated on 14 April, 2022 12:22 PM IST

ज्वारीचे कोढार म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख आहे. ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन हे राज्यातील सोलापूर, बीड, लातूर, आणि उस्मानाबाद जिल्ह्यात होते. परंतु ज्वारी काढणी, काढणी, मशागत, मळणी अशा कष्टाच्या कामांसाठी मजूर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे शेतकरी नगदी पिकांवर भर देत आहेत.

ज्वारी पेक्षा कडब्याला मागणी

जनावरांचा मुख्य चारा कडबा हा आहे. आता सध्या कडब्याला कमी मागणी आहे. परंतू येणाऱ्या काळात कडब्याची मागणी वाढणार आहे. कारण जून महिन्यात पाऊस झाल्यावर लगेच हिरवा जरा उपलब्ध होत नाही.

त्यावेळी कडब्याची आवशक्यता भासते. जुलै-ऑगस्ट दरम्यान कडब्याला विक्रमी दर मिळणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या कळला कडब्याची मागणी आणि बाजारभाव देखील वाढणार आहेत.

शेतकऱ्यांसाठीचे भारनियमन थांबवा; नाहीतर रस्त्यावर उतरणार, राजू शेट्टींचा इशारा

राज्यातील ज्वारीच्या क्षेत्रात दिवसेंदिवस घट होत आहे. शेतकऱ्यांचा कल नगदी पिकांकडे आहे. शेतकऱ्यांना ज्वारीपासून फारसे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे 2000 साली राज्यात 31 लाख 84 हजार हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली होती. यंदा केवळ 12 लाख 44 हजार हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
चिंताजनक : महाराष्ट्रात दोन दिवस गारपिटीची शक्यता
Prickly Pear : निवडुंगाची लागवड करा; आणि मिळवा लाखोंचा नफा

English Summary: Animal fodder will become more expensive; Kadabya than sorghum
Published on: 14 April 2022, 12:22 IST