News

मुंबईत आझाद मैदान येथे राज्यातील ऊस तोडणी मशिन मालक संघटनेचे ऊस तोडणी मशिनच्या प्रलंबित अनुदानाच्या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू आहे. राज्यातील जवळपास ९०० हून अधिक ऊस तोडणी मशिनधारकांनी आजपासून या आंदोलनास सुरवात केलेली आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Updated on 05 April, 2023 1:20 PM IST

मुंबई आझाद मैदान येथे राज्यातील ऊस तोडणी मशिन मालक संघटनेचे ऊस तोडणी मशिनच्या प्रलंबित अनुदानाच्या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू आहे. राज्यातील जवळपास ९०० हून अधिक ऊस तोडणी मशिनधारकांनी आजपासून या आंदोलनास सुरवात केलेली आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सदर तोडणी मशिनधारकांना अनुदान न मिळाल्याने सदरचे लोक आर्थिक अडचणीत आलेले आहेत. या आंदोलनस्थळी भेट देऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. ऊस (sugar cane) तोडणी सातशे रुपये करण्यात यावी, ऊस तोडणी मशीन मालकांसाठी लवाद स्थापन करण्यात यावा तसेच प्रलंबित अनुदान देण्यात यावे, अशा मागण्या करण्यात येत आहेत.

प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशीन मालक संघटनेतर्फे आझाद मैदानावर विशाल मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनाला खासदार उदयनराजे भोसले यांचाही पाठिंबा आहे. अशी माहिती संघटनेचे सचिव अमोल राजे जाधव यांनी दिली. या मोर्चात मोठ्या संख्येने ऊस तोडणी मशीन मालक सहभाग घेणार आहे.

उस्मानाबादी शेळीपालनाने शेतकरी होऊ शकतो श्रीमंत, जाणून घ्या काय आहे खासियत

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते अजित पवार, सहकार आयुक्त शेखर गायकवाड आणि सहकार मंत्री अतुल सावे यांना निवेदन देण्यात आले आहे. आता त्यांच्या मागण्या मान्य होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक, पॉर्न स्टारशी संबंध असल्याचा आरोप, जगभरात खळबळ

दरम्यान, ऊस तोडणी मशीन मालक यांच्या गेल्या अनेक दिवसांपासून मागण्या प्रलंबित आहेत. यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. यामुळे सरकारने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. याबाबत आता राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत.

धक्कादायक! मराठवाड्यात तीन महिन्यांत 214 शेतकरी आत्महत्या, दररोज दोन जणांच्या आत्महत्या..
शेतकऱ्यांनो जनावरांना शिळे अन्न खाऊ घातल्याने होऊ शकतो मृत्यू...
नाशिक जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांच्या जमिनीवर जप्ती! शेतकरी बसणार उपोषणाला..

English Summary: Agitation of Sugarcane Cutting Machine Owners Association in Raju Shetty Maidan..
Published on: 05 April 2023, 01:20 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)