राज्यात सध्या मे महिना संपत आला असला तरी मोठ्या प्रमाणावर ऊस शिल्लक आहे. यामुळे शेतकऱ्याने आत्महत्या देखील केल्या आहेत. यामुळे हा प्रश्न सध्या चांगलाच पेटला आहे. आता आंबाजोगाई तालु्क्यातील धानोरा खुर्द येथील रवींद्र ढगे यांनी ऊसाच्या फडाला लागून असलेल्या रस्त्यावर आपला संसार थाटला आहे. यामुळे या शेतकऱ्याची चर्चा सध्या सुरु आहे. यामुळे याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या शेतकऱ्याने म्हटले आहे की ऊसाचे उत्पादन घेणे हा काही गुन्हा नाही. अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे तो साखर कारखान्यांच्या यंत्रणेमुळे, कारखान्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे आज कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही मुश्किल झाले आहे. या (Sugar Factory) साखर कारखानदारांनीच माझा संसार उघड्यावर आणला आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
त्यांनी या आंदोलनातून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. रस्त्यावर ऊस, संसारउपयोगी साहित्य आणि आपल्या मुलाला घेऊन शेतकऱ्याचा आक्रोश व्यक्त केला आहे. काहीच दिवसांपूर्वी गेवराई तालुक्यातील नामदेव जाधव याने अतिरिक्त उसाच्या धास्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर वडवणी तालुक्यातील एका शेतकऱ्याने तर ऊसाच्या फडालाच आग लावून हा प्रश्न मिटवला होता.
नाथाभाऊंनी करून दाखवले!! 50 एकरात खजुराचे दमदार उत्पादन..
अनेकांचे ऊस आता २० महिन्यांचे झाले आहेत, उन्हाळ्यात ते पाण्याअभावी जळू नयेत म्हणून शेतकऱ्यांनी खूप प्रयत्न केले मात्र आता तो लवकर तोडला जात नसल्याने आता शेतकऱ्यांवर आर्थिक परिस्थिती ओढवली आहे. यामुळे ऊसाच्या फडाला लागूनच रवींद्र ढगे यांनी संसार मांडला आहे. शिवाय यंत्रणेने आपली कशी फसवणूक केली याचा त्यांनी पाढाच वाचला आहे.
मराठवाड्यातच अतिरिक्त उसाचा प्रश्न अधिक गंभीर होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. असे असताना शेतकऱ्यांचे पुढील पिकांचे गणित बिघडले आहे. यामुळे आता या शेतऱ्यांपुढे करायचे तरी काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बीड जिल्ह्यात अजूनही मोठ्या प्रमाणावर ऊस शिल्लक आहे.
महत्वाच्या बातम्या;
13 शेतकऱ्यांची क्रांती, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अंजिर खाणार भाव, शेतकरी होणार लखपती...
आता निवृत्तीचे वय आणि पेन्शनची रक्कम वाढणार! मोदी सरकारने केली तयारी
आता शेती परवडणार!! शेती परवडत नाही म्हणून पठ्ठ्याने बनवला ई-ट्रॅक्टर, एक तास चालवायचा खर्च फक्त 15 रुपये
Published on: 22 May 2022, 04:30 IST