सिल्लोड मतदार संघात होणाऱ्या महोत्सवासाठी कृषी खात्याला कृषी मंत्री अब्दुल सत्तारांनी कोट्यावधी रुपयांची वर्गणी गोळा करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
या महोत्सवासाठी कृषी खात्यातील अधिकाऱ्यांना पाच कोटी रुपयांची वर्गणी जमा करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. या वर्गणीसाठी चार प्रकारच्या हजारोंच्या प्रवेशिका तयार करण्यात आल्या आहेत. यामधून पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच कृषी महोत्सवात प्रवेशासाठी चार प्रकारचे व्हीआयपी पासेस तयार करण्यात आले आहेत. यामुळे कृषी विभागात खळबळ उडाली आहे. याच्या प्रवेशिका सर्व जिल्ह्यात पाठवण्यात आल्या आहेत
विजेचे रोहित्र वाहतुकीची जबाबदारी महावितरणचीच, शेतकऱ्यांची होतेय फसवणूक
दरम्यान, अब्दुल सत्तार वेगवेगळ्या कारणाने चर्चेत येत आहेत. त्यांच्या व्हायरल क्लिप देखील होत आहेत. तसेच त्यांनी मागील सरकारमध्ये असताना वाशीम जिल्ह्यातील ३७ एकर सरकारी जमीन वाटप करण्याचे आदेश दिले होते.
देशभरात राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा होतोय, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
सत्तेचा दुरुपयोग करून एका व्यक्तीला वाटप केल्याचा प्रकार आता जनहित याचिकेत उघड झाला आहे. या आदेशाला आता न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
महत्वाच्या बातम्या;
गायरान जमीन खासगी वापरासाठी, कृषिमंत्री अब्दुल सत्तार पुन्हा अडचणीत
सरकार म्हणतंय खतांचा पुरेसा साठा, मात्र युरियासाठी शेतकऱ्यांवर भटकंतीची वेळ
आता सोयाबीनपासून बनवले गुलाबजाम आणि पनीर, शेतकरी बनला लखपती..
Published on: 26 December 2022, 04:24 IST