News

चारा अडचणीवर मात करण्याचा मुरघास रामबाण उपाय आहे. तसेच मुरघास केल्यास शेतकऱ्यांना जास्तीचे कष्ट देखील करावे लागत नाही. यामुळे शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा होतो. मुरघास तयार करण्यासाठी लागणारी चारा पिके व त्यांची निवड करणे यावर सगळं गणित अवलंबून असते.

Updated on 11 April, 2023 10:30 AM IST

चारा अडचणीवर मात करण्याचा मुरघास रामबाण उपाय आहे. तसेच मुरघास केल्यास शेतकऱ्यांना जास्तीचे कष्ट देखील करावे लागत नाही. यामुळे शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा होतो. मुरघास तयार करण्यासाठी लागणारी चारा पिके व त्यांची निवड करणे यावर सगळं गणित अवलंबून असते.

चाऱ्याची पौष्टिकता टिकवून ठेवण्यासाठी हवाबंद साठवणूक करण्याच्या प्रक्रियेला मुरघास म्हणतात. मुरघास पिकांची निवड करताना पिके लवकर फुलोऱ्यात येणारे व लवकर तयार होणारे असावे. मूरघास करण्यासाठी एकदल पिकांची निवड करावी कारण, त्यामध्ये साखरेचे प्रमाण व कर्बोदके जास्त असतात त्यामुळे आंबवण्याची प्रक्रिया चांगली होते.

सर्व हिरव्या चाऱ्याचा मूरघास तयार करता येतो. तृणधान्य वर्गात मका, ज्वारी, बाजरी या पिकांचा समावेश होतो. ज्वारी आणि मका तर उत्तमच परंतु उसाचे वाढे, नागली, बाजरी, गिनी गवत, हत्तीगवत, पॅरा गवत इत्यादी चारा पिकापासून ही चांगला मुरघास तयार करता येतो. चारा पिकाची कापणी करताना त्यातील पाण्याचे प्रमाण ६५ ते ७० % असावे.

शूरवीर' म्हैसला तोडच नाही! वय 4 वर्षे, उंची 5.5 फूट आणि किंमत 15 कोटी, देशभरात प्रसिद्ध

मका ५० % पीक फुलोऱ्यामध्ये आल्यानंतर म्हणजेच पेरणीनंतर ६० ते ७० दिवसांनी कापणी करावी. ज्वारी ५०% पीक फुलोऱ्यात आल्यानंतर पेरणीनंतर ५० ते ६० दिवसांनी कापणी करावी. बाजरी ३०-४०% पीक फुलोऱ्यात आल्यानंतर पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी कापणी करावी. बहुवर्षीय वैरण पीके: संकरित जाती गवताच्या प्रजाती यशवंत, जयवंत, गुणवंत, संपूर्ण इत्यादी सर्वसाधारण पहिली कापणी ६० ते ७० दिवसांनी व त्यानंतरच्या कापण्या ३० ते ४० दिवसांनी कराव्या.

सरकारच्या ‘या’ निर्णयाने शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही, किसान सभेने थेट कारण सांगितले..

तयार झालेल्या चांगल्या मुरघासाचा वास आंबट-गोड येतो. फिक्कट हिरवा किंवा तपकिरी रंग दिसतो. उत्तम मुरघासाचा सामू (पी. एच.) ३.५ ते ४.५ असतो. काळा पडलेला सडलेला बुरशीयुक्त मुरघास हा निकृष्ट प्रतीचा मानला जातो. दुभत्या जनावरांना दररोज १० ते १५ किलो मूरघास खाऊ घालावा. बैलांना ७ ते ८ किलो पेक्षा जास्त देऊ नये. वासरांना त्यांच्या वयोमानाप्रमाणे मूरघास द्यावा.

मजुरांची कमतरता, यांत्रिकीकरणातील बिघाड
शेतकऱ्यांनो जनावरांमधील गंभीर आजार टाळण्यासाठी लसीकरणाची योग्य वेळ जाणून घ्या..
बैलगाडा जोडीने मैदान मारले! मालकाला थार गाडी जिंकून दिली

English Summary: A boon for farmers, know the exact method of making…
Published on: 11 April 2023, 10:30 IST