गेल्या सहा सात महिन्यांपासून ऊसाचा गाळप हंगाम सुरु आहे. यंदा ऊसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अतिरिक्त उसाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील साखर कारखान्यांनी (State Sugar Factory) आतापर्यंत १२२० लाख टन उसाचे विक्रमी गाळप केले आहे.
४६ कारखान्यांची धुराडी बंद
आतापर्यंत १२२० लाख टन उसाचे विक्रमी झाले आहे. तरीपण आणखी अतिरिक्त ऊस शिल्लक आहे. आणखी ८० लाख टन उसाचे गाळप (Sugarcane Crushing) करण्याचे आव्हान कायम आहे.
राज्यात एकूण १९८ कारखाने सुरु होते. त्यापैकी आता ४६ कारखाने बंद झाले आहेत. आणि एप्रिलअखेर अजून ४० कारखाने बंद होतील. साखर आयुक्तालयाला निरोप पोचवून कारखान्यांची धुराडी बंद केली जात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
आनंदाची बातमी : आता सोने तारण ठेवून मिळणार शेतीसाठी कर्ज
शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ; आता खतांचे भाव गगनाला भिडले
राज्यात यावर्षी 1300 लाख टनांहून अधिक ऊस होता. पहिल्या टप्प्यात कोल्हापूर विभागातील कारखान्यांनी सुमारे 300 लाख टन उसाचे गाळप केले आहे. पुणे विभागात 250 लाख टनांहून अधिक तर सोलापूर विभागात 300 लाख टनांहून अधिक गाळप झाले आहे.
सध्या कोल्हापूर परिसरातील 36 पैकी 30 कारखाने बंद पडले आहेत. हार्वेस्टर मराठवाड्यात पाठविण्याचे नियोजन सुरू आहे. याशिवाय पुणे विभागातील 2, सोलापूरमधील 9, नगरमधील 3 आणि औरंगाबाद आणि नागपूर भागातील प्रत्येकी एक कारखाने बंद करण्यात आले आहेत.
Onion Rate : कांद्याला निच्चांकी भाव, शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी
Published on: 19 April 2022, 11:08 IST