News

आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी दूध संघचालक तुपाशी, शेतकरी उपाशी अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राज्य सरकारनं गायीच्या दुधाला 34 रुपयांचा दर देण्याचा अध्यादेश काढला आहे. मात्र, हा दर फसवा आहे.

Updated on 28 July, 2023 2:41 PM IST

आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी दूध संघचालक तुपाशी, शेतकरी उपाशी अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राज्य सरकारनं गायीच्या दुधाला 34 रुपयांचा दर देण्याचा अध्यादेश काढला आहे. मात्र, हा दर फसवा आहे.

या दरवाढीच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना (swabhimani shetkari sanghatana) आक्रमक झाली आहे. ही दुधाची दरवाढ फसवी असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं म्हटलं आहे. मनमाड हा महामार्ग स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अडवला होता. दुध संघचालक तुपाशी, शेतकरी उपाशी अशी घोषणाबाजी यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली.

दूध दरासह दुधाला तेलंगणा सरकारप्रमाणं पाच रुपयांचे अनुदान देण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. या महामार्गावरच दुधाने अभिषेक करण्याचा निर्णय स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. दुधाच्या 3:2 या गुणप्रतीस लिटरला 34 रुपयांचा भाव मिळावा. एसएनएफचा 20 पैसे तर फॅटचा 30 पैसे दर निश्चित करावा.

टोमॅटोने भारताला रडवले, आता तांदूळ जगाला रडवणार! कारण काय जाणून घ्या..

तेलंगणा आणि कर्नाटक राज्याच्या धर्तीवर शेतकऱ्यांना प्रती लिटर पाच रुपयांचे अनुदान देण्यात यावे. पशुधनाला मोफत विमा सरंक्षण मिळावं, डबल टोन दुधावर बंदी आणावी, अशा मागण्या यावेळी शेतकऱ्यांनी केल्या.

 

राज्यातील 85 लाख 66 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 1866 कोटी रुपये रक्कम वितरित

अहमदनगर या जिल्ह्यातील प्रमुख सहकारी आणि खासगी दूध संघांनी आपापल्या हिशोबाने मनमानी करण्यास सुरुवात केली आहे. 3.5/8.5 गुणप्रति व्यतिरिक्त त्याखालील गुणप्रतिस किती दर द्यावा, अशी कोणतीही मार्गदर्शक नियमावली जारी नसल्यामुळं आपापल्या पद्धतीने दरामध्ये कपात करायला सुरुवात केली असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.

पिकविम्याच्या मदतीसाठी आता 92 तास मुदत करणार, केंद्राकडे पाठपुरावा करणार, कृषीमंत्र्यांची माहिती

English Summary: 34 rupees price cow milk a fraudulent price hike, milk unions starve, farmers starve; Farmers protested
Published on: 28 July 2023, 02:41 IST