स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये २३ विदेशी कंपन्यांनी महाराष्ट्रासोबत सुमारे ३०,००० कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले. यामुळे महाराष्ट्रातील सुमारे ६६,००० जणांना रोजगार उपलब्ध होईल, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
स्वाक्षरी केलेल्या विविध गुंतवणूक करारांपैकी ५५ टक्क्यांहून अधिक गुंतवणूकदार हे सिंगापूर, इंडोनेशिया, अमेरिका आणि जपानमधील आहेत. यामध्ये प्रामुख्याने फार्मास्युटिकल्स, कापड, अभियांत्रिकी, पॅकेजिंग, पेपर पल्प आणि फूड प्रोसेसिंग, स्टील, माहिती तंत्रज्ञान, डेटा सेंटर्स, लॉजिस्टिक्स इ. क्षेत्रांचा समावेश आहे.
दावोस येथील महाराष्ट्र लाउंजमध्ये एकूण ३०,३७९ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यातून महाराष्ट्रातील सुमारे ६६ हजार लोकांना रोजगार मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.
मॅग्नेटिक महाराष्ट्र २.०ही संकल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्याची अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी मांडण्यात आली. या उपक्रमांतर्गत एकूण १० आवृत्त्या आयोजित केल्या आहेत ज्याद्वारे आजपर्यंत १२१ सामंजस्य करार करण्यात आले आहेत. यापैकी राज्यात एकूण २.१५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक प्राप्त झाली आहे. यामुळे सुमारे ४ लाख रोजगार निर्माण होतील.
यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, अपर मुख्य सचिव (उद्योग) बलदेव सिंग, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उनबलगन, सह. सीईओ पी. डी.मलिकनेर उपस्थित होते.
इंडोरामा कॉर्पोरेशन आणि इंडोकाउंट इंडस्ट्रीज लि. सारख्या मोठ्या टेक्सटाईल कंपन्या अनुक्रमे महाराष्ट्र, नागपूर आणि कोल्हापूर येथील टेक्सटाईल हबमध्ये गुंतवणूक करतील.
मायक्रोसॉफ्ट ही जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर आयटी कंपनी पुण्यात डेटा सेंटर उभारण्यासाठी 3,200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
आशिया पल्प अँड पेपर (एपीपी) ही इंडोनेशियातील अग्रगण्य पल्प आणि पेपर उत्पादक कंपनी कागद आणि लगदाच्या उत्पादनासाठी रायगडमध्ये 10,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
‘हॅव्हमोर आईस्क्रीम्स प्रायव्हेट लिमिटेड’ पुण्यात आइस्क्रीम बनवण्यासाठी नवीन युनिट सुरू करणार आहे. त्यामुळे अन्न आणि कृषी प्रक्रियेलाही वाव मिळेल.
महत्वाच्या बातम्या
Important Research: कॅल्शियमच्या गोळ्या खातात का? तर सावधान! या गोळ्यांमुळे वयस्करातील हृदयविकाराने 33 टक्के वाढते मृत्यूची शक्यता
Bike Update:Hero Motocorp ने काही दिवसांपूर्वी लॉन्च केली Splendor+XTEC जाणून घ्या या बाईकचे वैशिष्ट्ये
Published on: 24 May 2022, 10:02 IST