राज्यातील २२ साखर कारखान्यांना १७६.५४ कोटी रुपयांचा दंड केला आहे. यामुळे सध्या याकडे लक्ष लागले आहे. यामुळे आता कारखान्यांना ही रक्कम भरावी लागणार आहे.
यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक आठ साखर कारखान्यांचा समावेश आहे. यावर साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी चांगलाच दणका दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत FRP रक्कम आणि इतर शासन निधीची कपात दिल्याशिवाय कोणत्याही गाळप साखर कारखान्यांना परवाना देता येत नाही.
याबाबत निर्णय घेण्यात आला होता. मात्र, विविध देय रक्कम आणि थकीत एफआरपी देणे बाकी असतानाही विनापरवाना ऊस गाळप सुरू केले. यात २२ कारखाने आहेत. तसेच पुणे जिल्ह्यातील देखील 3 कारखाने आहेत.
भात शेतीसोबत मत्स्यपालन करा, चांगले उत्पन्न मिळून दुप्पट उत्पन्न मिळेल
यामध्ये पुणे जिल्ह्यात राजगड या कारखान्यात २ कोटी ६२ लाख ७५ हजार ५००, निरभिमा या साखर कारखान्यास ३ कोटी १६ लाख, कर्मयोगी शंकरराव पाटील कारखान्यास १९ कोटी ६४ लाख ४५ हजार ५००.
सोलापूर जिल्हा मातोश्री लक्ष्मी शुगर- एक कोटी १६ लाख ५२ हजार ५००. भीमा सहकारी साखर कारखान्यास १३ कोटी ३ लाख ५५ हजार दंड. जकाराय साखर कारखान्यास १० कोटी ५७ लाख २० हजार दंड ठोठावला. श्रीशंकर सहकारी साखर कारखान्यात १ कोटी ६१ लाख ४६ हजार ५०० एवढा दंड आकारला आहे.
मी जुगार खेळलो मला अटक करा, शेतकऱ्याची कथा ऐकून डोळ्यात येईल पाणी..
तसेच ओंकार शुगर कारखान्यात ४१ लाख १४ हजार ५०० एवढा दंड करण्यात आला. (Sugar Production) आष्टी शुगर कारखान्यास १ कोटी १२ लाख ६७ हजार ५०० रुपये दंड ठोठावण्यात आला. मकाई कारखान्यास ७ कोटी ९६ लाख ६७ हजार ५०० एवढा दंड आकारण्यात आला.
तसेच जालन्यात समृद्धी शुगर्स १४ कोटी ६४ लाख १८ हजार ५०० श्रद्धा एनर्जी १५ कोटी ९७ लाख ९५ हजार ५०० रामेश्वर- पाच कोटी ५२ लाख ५० हजार दंड आकारला आहे, इत्यादी कारखान्यांचा समावेश आहे.
आता मजुरांनाही मिळणार विम्याचा लाभ, जाणून घ्या...
बारामतीच्या अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचा आर्टिफिशियल इंटेलिजेंस मधील संशोधनाबाबत सामंजस्य करार
आता धेनू अॅपमधील डिजिमार्ट देणार व्यावसायिकांना लाखों रुपये कमावण्याची संधी...
Published on: 08 May 2023, 12:09 IST