पपई लागवड महाराष्ट्रामध्ये केली जाते. एक महत्त्वपूर्ण फळपीक असून बरेच शेतकरी बिगरहंगामी पपईची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात व चांगले उत्पादन देखील घेतात. पपई बागेतून चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टींचे अंमलबजावणी केली तर नक्कीच पपई पिकाच्या माध्यमातून चांगले उत्पादन आणि आर्थिक उत्पन्न मिळू शकते. त्यासंबंधी या लेखात आपण माहिती घेऊ.
नक्की वाचा:Crop Technology: फळबागेमध्ये हवे भरपूर उत्पादन तर करा संजीवकांचा वापर, होईल आर्थिक फायदा
पपई बागेत विविध भाजीपालासारख्या आंतरपिकांची लागवड
शेतकरी बंधूंना माहिती आहेच की पपई बागेमध्ये विविध भाजीपाला पिकांची आंतरपीक म्हणून लागवड करू शकतात. त्यामुळे शेतकरी बंधूंना अतिरिक्त उत्पन्नाचा फायदा होतो.
जर आपण जाणकारांचा विचार केला तर त्यांच्या मते, पपई लागवडीतून शेतकरी जास्त कष्ट न करता चांगली कमाई करू शकता. जर आपण आंतरपिकांचा विचार केला तर पपई लागवडी सोबत कडधान्य पिकांचे आंतरपीक म्हणून लागवड करून शेतकरी चांगले उत्पन्न मिळवू शकतात.
तसेच पपईमध्ये वाटाणा, मेथी, हरभरा तसेच फ्रेंच बीन्स आणि सोयाबीनची देखील आंतरपीक म्हणून लागवड करता येणे शक्य आहे व या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळू शकते.
नक्की वाचा:Coconut Farming: नारळ शेतीतील संधी आणि नारळाच्या उत्पादनाचे महत्त्व,वाचा महत्वाची माहिती
पपई शेतीचे आर्थिक गणित
जर आपण पपईच्या झाडापासून मिळणाऱ्या उत्पादनाचा विचार केला तर तज्ञांच्या मते प्रत्येक हंगामात पपईच्या झाडापासून चाळीस किलोपर्यंत फळे मिळणे शक्य आहे.
जर आपण बाजारपेठेत 40 ते 50 रुपये किलो एवढा बाजार भाव पकडला तरी शेतकरी चांगला नफा मिळवू शकतात. आपल्याला माहित आहेस की बाजारभाव स्थिर नसतात व त्यामध्ये कायम चढ-उतार होत असतो त्यामुळे मिळणारे आर्थिक उत्पन्न देखील कमी-अधिक होऊ शकते.
तज्ञांच्या मते एक हेक्टर जमिनीत जर पपईची 2250 रोपांची लागवड केली तर एका झाडाला 40 किलो काळ पकडले तरी प्रत्येक हंगामात 900 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळू शकते.
सरासरी 30 रुपये किलो हा भाव जरी पडला तरी जवळजवळ 27 लाखापर्यंत उत्पादन मिळू शकते. तसेच त्यामध्ये केलेल्या आंतरपिकांच्या माध्यमातून देखील तुम्हाला आर्थिक उत्पन्न अतिरिक्त पद्धतीने मिळणार आहे.
नक्की वाचा:शेतकऱ्यांनो पपई लागवडीसाठी ऑक्टोबर महिना सर्वोत्तम; कमवू शकता लाखों रुपयांमध्ये उत्पन्न
Published on: 08 October 2022, 05:26 IST