Horticulture

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सगळ्यात प्रमुख समस्या असेल ती म्हणजे होणारी फळगळ होय. शेतकरी बंधूंचे खूप मोठे नुकसान होते. जर आपण विदर्भाचा विचार केला तर या ठिकाणी जास्त करून संत्रा लागवड आहे. परंतु संत्रा फळगळ ही फार मोठी समस्या होऊन बसली आहे. या लेखात आपण संत्रा फळगळ का होते? त्याबद्दल माहिती घेऊ.

Updated on 28 September, 2022 12:43 PM IST

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सगळ्यात प्रमुख समस्या असेल ती म्हणजे होणारी फळगळ होय. शेतकरी बंधूंचे खूप मोठे नुकसान होते. जर आपण विदर्भाचा विचार केला तर या ठिकाणी जास्त करून संत्रा लागवड आहे. परंतु संत्रा फळगळ ही फार मोठी समस्या होऊन बसली आहे. या लेखात आपण संत्रा फळगळ का होते? त्याबद्दल माहिती घेऊ.

 संत्रा फळगळ होण्याची प्रमुख कारणे

1- वातावरणाचा होतो परिणाम- संत्रा बागेमध्ये तापमान, आद्रता आणि वारा इत्यादी गोष्टीचा फार मोठा परिणाम होतो. तापमानात झालेल्या बदलामुळे एप्रिल महिन्यात आंबिया बहराच्या फळांची गळ होऊ शकते.

तापमानामध्ये जर वाढ झाली तर कच्च्या फळांची गळ खूप मोठ्या प्रमाणावर होते व त्यासोबतच हवेतील कमी आद्रता सुद्धा यासाठी कारणीभूत ठरते. वातावरणातील बदल हा फेब्रुवारी ते मार्च महिन्यात आंबिया बहाराची गळ होण्यासाठी कारणीभूत आहे.

नक्की वाचा:Coconut Farming: नारळ शेतीतील संधी आणि नारळाच्या उत्पादनाचे महत्त्व,वाचा महत्वाची माहिती

2- पाण्याचा पुरवठा- जेव्हा फळधारणा होते व त्यानंतर जर पाण्याचा ताण बसला तर फळांची गळ होते. मुर्गबहारात फळधारणा झाल्यानंतर पावसाने दडी मारली

तर फळगळ होण्यास सुरुवात होते. याउलट जमिनीत आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी झाल्यासही फळगळ होण्याची शक्यता असते.

3- व्यवस्थापनातील कमजोरी- पावसाळ्यामध्ये जर बागेत पाणी साचून राहत असेल तर यामुळे देखील फळगळ होते. तसेच आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात व चुकीच्या पद्धतीने व झाडाच्या खोडाला लागेल अशा प्रकारे पाणी दिल्यास देखील फळगळ होते. बऱ्याच संत्रा बागेमध्ये सल काढण्यात येत नाही व त्यामुळे बुरशीची वाढ होऊन देखील फळगळ होते.

नक्की वाचा:Custerd Apple: सिताफळ लागवडीचा प्लान असेल तर 'या'चार जाती नक्कीच ठरतील शेतकऱ्यांसाठी वरदान

4- अन्नद्रव्यांची कमतरता-जमिनीमध्ये मुख्य,दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा कमतरतेमुळे फळांचे योग्य पोषण झाड करू शकत नाही व तेवढीच फळे झाडावर टिकतात.जमिनीत जस्ताचे प्रमाण कमी असल्याचे देखील मोठ्या प्रमाणात फळगळ होते.

5- कीड रोग- काही उपद्रवी कीड व रोग यामुळे देखील ही समस्या उद्भवते. जर आपण याबाबतीत आंबिया बहराचा विचार केला तर रसशोषण करणाऱ्या पतंगामुळे ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात फळे गळतात. तसेच काही रोगकारक बुरशीं म्हणजेच फायटोप्थोरा सारख्या बुरशीमुळे देखील फळगळ होऊ शकते.

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मृग बहराच्या फळांची गळ होते. सतत पाऊस सुरू असल्यास देखील मृग बहाराची फळे काळी पडून मोठ्या प्रमाणात गळताना दिसतात.

बऱ्याचदा वाटाणा ते बोराच्या आकाराचे फळे देठावरील प्रादुर्भावामुळे पडतात. अल्टरनेरिया बुरशीची फुलांच्या बिजंडावर लागण होते व फळे काढणीच्या अवस्थेत आल्यावर फळांची गळ होते.

6- ॲबसिशन रेषा- बऱ्याचदा चांगला भावासाठी फळांची तोडणी न करता ते बागेमध्ये राखून ठेवले जातात व अशा परिस्थितीत फळांच्या देठाजवळ ॲबसीशन रेषा तयार होतात व फळगळ होते. या प्रकारची गळ उत्पादनामध्ये मोठी घट आणू शकते.

नक्की वाचा:Mango Cultivation: आंबा लागवडीसाठी वापरा 'ही'पद्धत, मिळवा कमी क्षेत्रात भरपूर उत्पादन

English Summary: this is main reason behind fruit drop to citrous orchred and management so take precaution
Published on: 28 September 2022, 12:43 IST