आपल्याला माहित आहे की शेतकरी बंधू विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेऊ लागले आहेत. त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील बरेच शेतकरी शेडनेट तंत्राचा वापर करून मोठ्या प्रमाणावर चांगला दर्जेदार आणि निर्यात करण्याजोगा भाजीपाला करण्याकडे शेतकर्यांचा जास्तीत जास्त कल दिसतो. शेतमालाची निर्यात एक प्रक्रिया असून त्यासाठी बर्याच अशा प्रकारची कागदपत्रांची आवश्यकता भासते. या लेखामध्ये आपण शेतमाल निर्यात करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती घेणार आहोत.
नक्की वाचा:Crop Tips: 'या' गोष्टींकडे लक्ष दिल्यास वांग्याचे उत्पादन वाढेल हमखास, वाचा सविस्तर
शेतमाल निर्यातीसाठी आवश्यक कागदपत्रे
आयात निर्यात परवाना- तुम्हाला देखील भाजीपाला निर्यात व्यवसायात पडायचे असेल तर तुम्हाला अगोदर शेतमालाचे आयात-निर्यात परवाना काढणे आवश्यक असून हा परवाना काढण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता लागते ते म्हणजे…
1-संस्था नोंदणी प्रमाणपत्र,आयकर विभागाकडून मिळणारा खाते क्रमांक व त्याची झेरॉक्स प्रत, प्रपत्रनुसार बँकेच्या लेटरहेडवर प्रमाणपत्र
2- दोन पासपोर्ट साईज फोटो, बँकेच्या प्रपत्रा वरील पासपोर्ट साईज फोटो वर बँक अधिकाऱ्यांची साक्षांकित केलेले आवश्यक असते.
3- सहसंचालक विदेश व्यापार यांच्या नावे इंग्रजी अक्षरात लिहिलेले एक हजार रुपयांचा पुणे किंवा मुंबई येथील राष्ट्रीयीकृत बँकेत देय असलेला डिमांड ड्राफ्ट तसेच प्रपत्रानुसार घोषणापत्र आवश्यक असते.
4-A4 आकारातील पाकीट आणि तीस रुपयांचे पोस्टल स्टॅम्प
5- अर्जाबाबत याची माहिती व पत्र यांचे नमुने http://dgft.delhi.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध असतात. प्रपत्रातील तपशीलवार माहिती भरून अर्जदाराने सहसंचालक विदेशी व्यापाऱ्यांच्या पुणे ते मुंबई कार्यालयात स्वतःच्या हस्ते किंवा नोंदणीकृत टपाल सेवेने सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर करावा.
6- त्यानंतर हा आयात निर्यात परवाना तुम्हाला मिळाल्यानंतर निर्यात वृद्धि परिषदेकडील नोंदणी प्रमाणपत्र मिळवणे गरजेचे असते. यासाठी कृषिमाल व प्रक्रिया पदार्थ निर्यातीसाठी अपेडा नवी दिल्ली यांच्या विभागीय कार्यालय किंवा अपेडाच्या वेबसाईटवर नोंदणी करता येते.
शेतमाल सुरक्षिततेबाबत हमी देण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
1- ग्लोबल गॅप सर्टिफिकेट
2- आरोग्यविषयक प्रमाणपत्र
3- पॅक हाऊस प्रमाणपत्र
4- ऍगमार्क प्रमाणपत्र
5- सॅनिटरी प्रमाणपत्र
नक्की वाचा:Magnet Project: नेमका काय आहे मॅग्नेट प्रकल्प? शेतकऱ्यांसाठी कसा आहे फायद्याचा?
आयातदार कसा शोधावा?
या सगळ्या प्रक्रियेनंतर आपल्याला भाजीपाला व तत्सम कृषी उत्पादने निर्यात करता येतात. परंतु ते घेण्यासाठी बाहेरील देशातील आयातदार शोधावा लागतो.त्यासाठी अपेडा सारख्या संस्थांच्या संकेतस्थळावर जाऊन माहिती उपलब्ध करता येते.
नंतर आयातदाराची माहिती मिळाल्यानंतर प्रत्यक्ष आयात दाराशी संपर्क साधून आपला भाजीपाला मालाची माहिती द्यावी लागते. तसेच संबंधित आयातदाराची बाजारातील पत तपासणे फार आवश्यक असते. हे पत तपासणीचे काम एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कार्पोरेशन ऑफ इंडिया या शासकीय संस्थेकडून केले जाते.
निर्यातीसाठी कागदपत्र तयार करण्यासाठी तसेच विमानात किंवा जहाजात जागा रिझर्व करण्यासाठी आणि कस्टम क्लिअरिंग साठी सी एच ए म्हणजेच कस्टम हाऊस एजंटची नेमणूक करणे फायद्याचे असते. हे एजंट मुंबई आणि पुण्यात उपलब्ध असतात.
जर शेतकऱ्यांनी वरीलपैकी कागदपत्रांची पूर्तता केली आणि व्यवस्थित तांत्रिक दृष्ट्या माहिती मिळवली तर आपण केलेल्या क्षेत्रांमध्ये चांगले स्थान मिळवून आपल्या आर्थिक परिस्थिती उंचावू शकतो.
Published on: 16 September 2022, 07:08 IST