शेतीमध्ये विविध तंत्रज्ञानाचा वापर आता शेतकरी करीत आहेत. विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी विविध प्रकारची पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेत आहेत.
शेतीमध्ये विविध तंत्रज्ञानाचा वापर आता शेतकरी करीत आहेत. विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी विविध प्रकारची पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेत आहेत. तसेच विविध प्रकारचे कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विद्यापीठांकडून देखील शेतीच्या संबंधित बहुमोल संशोधन करण्यात येऊन ते शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात येत आहे. पॉलिहाऊस किंवा शेडनेटमध्ये संरक्षित पद्धतीने पिके घेण्याची पद्धत त्यामुळे शेतकरी करताना दिसतात. जर आपल्याकडील हवामानाचा विचार केला तर त्यामध्ये विविधता आहे. त्यामुळे बऱ्याच प्रकारची भाजीपाला पिके घेणे खूप मोठी शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पॉलिहाऊस तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांना उच्च दर्जाची आणि गुणवत्तेची पिके घेण्यासाठी खूप फायदेशीर आहे. परंतु पॉलिहाऊस उभारण्याचा खर्च हा खूपच येत असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना परवडण्यासारखा नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत पॉलीहाऊस साठीचा स्वस्त पर्याय म्हणजे नेट हाऊस ठरू शकतो. यांनी हाऊस मध्ये शेतकरी एकाच हंगामात चार पिके घेऊ शकतात. हे नवीन पॉलिहाऊस ला पर्यायी नेट हाऊस KVK ICAR CAZRI जोधपुर यांनी विकसित केले असून याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी दिली.
हे नेट हाऊस दीड लाख रुपये खर्चून उभारता येणे शक्य
याबाबतची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री, कैलास चौधरी यांनी ट्विटरवरून देतांना म्हटले की, या केवीके ने विकसित केलेले नेट हाऊस केवळ दीड लाख रुपये खर्चून बसवता येणे शक्य आहे. महागड्या अशा पॉलिहाऊस ला हा उत्तम पर्याय उपलब्ध होईल. तसेच त्यांनी ट्विटर मध्ये म्हटले आहे की पश्चिम राजस्थानचे शेती खूपच आव्हानात्मक आहे. त्यामुळे KVK ICAR-CAZRI जोधपूर या आव्हानांना संधी मध्ये रूपांतरित करण्याचे काम करत असून संशोधनात नावीन्य आणून चांगले काम करण्यास सक्षम आहे.
एका वर्षात निघेल खर्च
याबाबतीत केंद्रीयमंत्री कैलाश चौधरी म्हणाले की, हे विकसित केलेले नेट हाऊस बसवून शेतकरी एका वर्षात टोमॅटो, चेरी टोमॅटो, काकडी आणि मिरचीची चार पिके घेऊ शकतात. त्यांनी सांगितले की नेट हाउस उभारल्यानंतर पहिल्या वर्षीच शेतकरी त्याचा खर्च काढू शकतात व त्यानंतर नफा होतो आणि शेतकरी पाच वर्षासाठी अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतात.
पाच वर्षानंतर केवळ पंचवीस हजाराचा खर्च
हे नेट हाऊस आठ मीटर रुंद तर 16 मीटर लांब असून त्याची उंची 3.50 मिटर आहे. त्याचबरोबर नेट हाऊस मध्ये 2.50मीटर उंचीपर्यंत वायर टाकून झाडे स्थिर करता येतात. हे नेट हाउस बसवल्यानंतर पाच वर्षे कोणताही खर्च करावा लागणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
पाच वर्षानंतर नेट हाऊस वर केवळ 25 हजार रुपये खर्च येतो. तो म्हणजे पाच वर्षानंतर नेट बदलावी लागते त्यामुळे हा खर्च येईल.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:दुर्मिळ माहिती:पानवेलच्या 'या' जातींची लागवड करा आणि मिळवा 9 ते 15 वर्षांपर्यंत पैसा
Published on: 08 May 2022, 11:22 IST