शेताची सुपीकता टिकवण्यासाठी शेतकरी त्यामध्ये शेणखत, लेंडी खत, गांडूळ खत यांचा पुरेपूर वापर करतात. यामध्ये बरेच शेतकरीधरणातील किंवा तलावांमधील पाणी कमी झाल्यानंतरत्यातील गाळ आपल्या शेतात टाकतात.
तसे पाहायला गेले तर गाळ माती टाकण्याचे खूप महत्त्वपूर्ण फायदे आहेत.गाळ माती शेतात टाकल्याने जमिनी दर्जेदार व सुपीक होते व महत्त्वाचे म्हणजे ओलावा साठवून ठेवण्याची क्षमता सुद्धा वाढते. गाळामध्येविविध प्रकारचे नैसर्गिक अन्नद्रव्य तसेच सेंद्रिय पदार्थव चिकणमातीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते.त्यामुळे असा गाळ शेतासाठी वपर्यायाने चांगल्या उत्पादनासाठी खूप महत्त्वाचा आहे.परंतु गाळ टाकतानाकाही काळजी सुद्धा घ्यावी लागते वप्रत्येकच गाळ माती हीशेतात टाकायला योग्य नसते.त्याबद्दल या लेखात आपण माहिती जाणून घेणार आहोत.
गाळ माती वापरताना घ्या ही काळजी
1- शेतात जर गाळ टाकायचा असेल तर तो मार्च ते मे महिन्यामध्ये जमीन कोरडी पडते तेव्हासाठवण पद्धतीने गाळ माती काढून शेतात पसरून घ्यावी.
2- फळबाग लागवड करायची असेल तर खड्डा खोदून किंवा शेताचा उतार ज्या दिशेस असेल त्यानुरूप चर खोदून त्यात गाळ माती भरावी.
3- जमिनीत गाळ काढताना हलक्या व ज्या जमिनीची पाणी धारण क्षमता कमी आहे अशा जमिनीत गाळ मातीचा वापर करावा.
4- जमिनीतील चिकन मातीचा प्रकार कोणता आहे त्यानुसार गाळ माती ची मात्राठरवावी.
या प्रकारची गाळ माती शेतात टाकू नये
1-गाळ मातीचा सामू साडे आठ पेक्षा जास्त असेल तर अशा मातीचा उपयोग करू नये.
2- पाणी साठवण पद्धतीच्या काठावरची माती शेतात पसरवण्यासाठी वापरू नये.
3-चुनखडी असलेली गाळ माती शेतात वापरू नये.आशा गाळ मातीचा जमिनीतील अन्नद्रव्यांचा विपरीत परिणाम होतो व पिकांची उत्पादकता घटते.
4- योग्य प्रमाणात गाळ मातीचा वापर करणे महत्त्वाचे आहे तरच त्याचा फायदा होतो नाहीतर फायदा होण्याऐवजी पिकांना नुकसान होण्याचा धोका संभवतो.
5-गाळ मातीचा वापर करताना जमिनीचा प्रकार, जमिनीचा सामू तसेचतिच्या रासायनिक व भौतिक गुणधर्म यांचा विचार करणे गरजेचे आहे.
शेतात गाळ टाकण्याचे फायदे
1- तलाव किंवा धरणात जमा झालेल्या गाळ माती मध्येअन्नद्रव्य आणि चिकणमातीचे प्रमाण जास्त असते व पिकांना त्याचा फायदा होतो.
2-पिकांच्या सदृढ वाढीसाठी व चांगल्या उत्पादनासाठी गाळ मातीउपयुक्त ठरते.
3- गाळ माती जमिनीतील पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढवते.
4- हलक्या व मध्यम प्रतीच्या जमिनीत गाळ माती टाकली तर अशा जमिनीची सुपीकता वाढते व पीक चांगले येते.
5- गाळ जमिनीत टाकल्यास जमिनीतील स्फुरद, सेंद्रिय कर्ब व पालाश तसेच अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढते.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:खतासंबंधी महत्वाची बातमी! DAP ला मिळाला PROM चा पर्याय, वाचा सविस्तर माहिती
Published on: 16 May 2022, 11:14 IST