फळझाडांची अभिवृद्धी बियांपासून केली तर झाडे उंच वाढतात व फळे धरण्यास अधिक कालावधी लागतो. त्यासोबत मातृवृक्षासारखे चांगली फळे आणि उत्पन्न मिळत नाही.
त्यामुळे औषध फवारणी, छाटणी, फळांची काढणी इत्यादी कमी खर्चिक व त्रासदायक होता त्यामुळे फळझाडांची योग्य प्रमाणात कलमे करतात. तसेच नवीन संकरित जाती निर्माण करण्यासाठी कलमांची खुंट तयार करण्यासाठी आणि पपया तसेच एकदल पिकांच्या अभिवृद्धीसाठी बीयांचा वापर आवश्यक ठरतो. या लेखामध्ये आपण कलमांच्या काही सुधारित पद्धती जाणून घेऊ.
कलमांच्या सुधारित पद्धती
1- मृदूकाष्ट कलम - या पद्धतीने आंबा, काजू, फणस, चिकू आणि कोकम इत्यादी फळझाडांची अभिवृद्धी करता येते. या पद्धतीत व कोय कलम करण्याच्या पद्धतीत कोणताही बदल नाही. परंतु या पद्धतीत खुंट म्हणून वापरले जाणारे रोप उंच वाढलेले आणि आंब्यामध्ये तीन महिने वयाचे पहिली फूट जून झाल्यावर तर काजूमध्ये 45 ते 60 दिवसाचे असते. या रोपावर येणाऱ्या नवीन शेंड्याकडील कोवळ्या फुटीवर कलम केले जाते.
या पद्धतीने ज्या ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष आहे अशा डोंगर-उताराच्या जागेवरच दोन ते तीन रोपे वाढवून त्यावर मृदूकास्ट पद्धतीने कलम करून घेता येते. कोरड्या आणि उष्ण हवामानामध्ये लावलेल्या कलमांची मोठ्या प्रमाणावर मर होते. अशा ठिकाणी या पद्धतीने कलमे करावीत. आंब्यामध्ये ही कलमे करण्यासाठी फेब्रुवारी ते एप्रिल हा काळ योग्य आहे तर काजूमध्ये थंडीचा हंगाम वगळता वर्षभर केव्हाही कलमे करता येतात. यामध्ये 85 टक्के यश मिळते.
2- बगल कलम- या पद्धतीमध्ये दीड ते अडीच वर्षे फळझाडांची रोपे खुंट म्हणून वापरतात. या पद्धतीत सुमारे 60 टक्के यश मिळते. आंब्यामध्ये या पद्धतीने ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कलमे करावीत. या पद्धतीने कलमे करताना आणि नंतर पाणी देण्याची गरज नाही.
3-कोपाईस कलम- बियांपासून केलेल्या काजूच्या / आंब्याच्या जुन्या, कमी उत्पन्न देणाऱ्या आणि कमी गुणवत्तेच्या झाडाचे चांगल्या, जातिवंत आणि जास्त उत्पन्न देणाऱ्या झाडांमध्ये रूपांतर करण्यासाठी कोपाईस कलम पद्धत वापरावी.
. या पद्धतीमध्ये पंधरा वर्षे वयापर्यंत याची झाडे जमिनीपासून सुमारे 75 सेंटीमीटर ते 1 मीटर उंचीचे खोड ठेवून करवतीने छाटून टाकावीत. डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत झाडांची छाटणी करावी. छाटलेल्या खोडापासून 25 ते 30 नवीन फुटवे येतील. त्यापैकी खोडाच्या वरील 30 ते 45 सेंटिमीटर भागातून निघणारे चार ते पाच जोमदार निरोगी फुटवेअर निवडून त्यावर मृदू काष्ट पद्धतीने फेब्रुवारी ते एप्रिल या हंगामात कलम बांधावे. फाटलेल्या खोडाला खोड किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून 50 टक्के पाण्यात मिसळणारी कार्बारिल भुकटी चे द्रावण आणि रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बोर्डो पेस्ट चा दरवर्षी जून ते जुलैमध्ये लेप द्यावा. तसेच उन्हामध्ये संपूर्ण उघड्या पडलेल्या खोडांना सावली करावी.
4-व्हीनियर कलम - या पद्धतीत आठ ते दहा महिने वयाची रोपे खुंट म्हणून वापरतात. या खुंटावर एका बाजूस सुमारे पंधरा सेंटीमीटर वर पाच ते सात सेंटिमीटर लांबीचा तिरकस उभा काप घ्यावा. या कापाची खोली खुंटाच्या जाडीच्या एक तृतीयांश पेक्षा जास्त नसावी. नंतर या कापाच्या खालच्या टोकास थोडासा आडवा व तिरकस काप घेऊन साल व आतील भाग काढून घ्यावा.
नंतर मातृवृक्षाच्या काडीवर पाच ते सात सेंटिमीटर आकाराचा तिरकस काप घ्यावा आणि ही फांदी खुंटावर दिलेल्या कापावर व्यवस्थित बसवून घ्यावी. सुमारे वीस दिवसात काडीला नवीन फूट येते वही फूट पाच ते सात सेंटिमीटर वाढल्यानंतर जोडावर असलेला खुंटाचा शेंडा कापून टाकावा.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:साखर कारखान्यांबाबत अजित पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले ज्यांच्यात धमक असेल त्याने..
Published on: 27 April 2022, 03:39 IST