Horticulture

प्रयोगशाळेमध्ये कृत्रिमरित्या स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणूंची वाढ करून योग्य माध्यमात मिसळून तयार केल्या जाणाऱ्या खताला पीएसबी म्हणजे स्फुरद विरघळणारे जिवाणू खत असे म्हणतात.

Updated on 28 April, 2022 2:35 PM IST

 प्रयोगशाळेमध्ये कृत्रिमरित्या स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणूंची वाढ करून योग्य माध्यमात मिसळून तयार केल्या जाणाऱ्या खताला पीएसबी म्हणजे स्फुरद विरघळणारे जिवाणू खत असे म्हणतात.

 आपल्याला  माहित  आहेस कि स्फुरद म्हणजे फास्फोरस हे महत्त्वाचे प्राथमिक अन्नद्रव्य म्हणून पिकाला आवश्यक असते. बहुतांश पिकांमध्ये विविध खताचा रूपात आपण ते पिकांमध्ये विविध खताचा रूपात पुरवठा करत असतो. परंतु डीएपी,  सिंगल सुपर फॉस्फेट किंवा इतर कोणत्याही मिश्रखतामधून दिलेला फास्फोरस पूर्णपणे पिकाला मिळत नाही व जमिनी त्याचे फिक्सेशन किंवा स्थिरीकरण होते. पीएसबी हे जिवाणू खत वापरले तर खतातील मित्र सूक्ष्मजीव जमिनीतील स्थिरीकरण झालेला स्फुरद बऱ्याच प्रमाणात विरघळून पिकाला मिळवून देण्याचे काम करतो.

 पिएसबी कोणत्या पिकाला वापरली जाऊ शकते?

 एसबीआय जिवाणू खताचा वापर सोयाबीन, तूर, उडीद, मूग, कपाशी, ज्वारी, हळद, हरभरा, गहू, मका तसेच शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विविध भाजीपाला पिके  व फळपिके यामध्ये शास्त्रीय शिफारसीनुसार तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केला जाऊ शकतो.

याचा वापर बीजप्रक्रिया द्वारे, शेणखतामध्ये एकत्र मिसळून जमिनीत किंवा योग्य प्रमाणात सेंद्रिय खत उपलब्ध असणाऱ्या जमिनीत द्रवरूप पीएसबी या जिवाणू खताचा वापर फळ,भाजीपाला पिकात ठिबक सिंचनाद्वारे तसेच रोपांच्या मुळावर आंतररक्षीकरण पद्धतीने गरजेनुसार शिफारशीप्रमाणे तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केला जाऊ शकतो. वर निर्देशित केलेल्या पिकांमध्ये अडीचशे ग्रॅम पीएसबी प्रति दहा किलो बियाण्यास या प्रमाणात पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. द्रवरूप स्वरूपात पीएसबी उपलब्ध असल्यास 250 मिलीपीएसबी प्रति 30 किलो सोयाबीन म्हणजेच आठ ते दहा मिली द्रवरूप पीएसबी प्रति किलो बियाण्यास या प्रमाणात पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. बीजप्रक्रिया करताना 30 किलो सोयाबीन पातळ ताडपत्रीवर पसरुन त्यावर 250 मिली पीएसबी या द्रवरूप जिवाणू खताचा शिडकावा द्यावा गरज वाटली तर थोड्याशा गुळाच्या पाण्याचा शिडकावा द्यावा. सोयाबीन सारखे बियाणे जास्त ओले करू नये.

. हाताने बियाण्याला चोळू नये. सावलीत 15 ते 20 मिनिटे वाळवावे व नंतर पेरून घालावे. फार पूर्वी बीजप्रक्रिया करून बियाणे ठेवू नये बीज प्रक्रिया केल्यानंतर शक्य तितक्या लवकर पेरणी करावी.

 पीएसबी जिवाणू खताचा वापर करताना ही काळजी घ्या

1- पीएसबी किंवा इतर कोणतेही जिवाणूसंवर्धक घरी आणल्यानंतर त्याचा वापर शक्य तितक्या लवकर करावा. तसेच थंड किंवा कोरड्या जागी साठवावे.

2- जर पीएसबी किंवा इतर जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करायचे असेल तर रासायनिक बुरशीनाशकाची पणबीज प्रक्रिया करायची असेल तर अगोदर रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया प्रथम करावी व नंतर पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.

जर रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया केल्यास पीएसबी जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया चे प्रमाण शिफारशीपेक्षा दीडपट ठेवावे.

3- कोणाच्याही रासायनिक खतासोबत पीएसबी मिसळू नये.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:वनौषधी आहेत निसर्गाची महत्त्वाचे देण; जाणून घेऊ विविध वनौषधींची आरोग्याला होणारे फायदे

नक्की वाचा:खूपच महत्वाचे! फळे भाजीपाला जास्त काळ टिकवायचे असेल करा या पद्धतीचा अवलंब, होईल फायदा

नक्की वाचा:या 4 सिताफळाच्या जाती देतील सिताफळ उत्पादकांना चांगले आर्थिक स्थैर्य अन आर्थिक नफा,नक्की वाचा महत्वपूर्ण माहिती

English Summary: psb bacterial fertilizer is useful and most benificial to all crop
Published on: 28 April 2022, 02:35 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)