Horticulture

प्राचीन काळापासून भारतीय जीवनात भाजीपाला पिकास विशेष महत्व आहे. विसाव्या शतकातही ही भाजीपाल्याचे महत्व अत्यंत वाढत असल्याचे दिसुन येते. भाजीपाला पिकाचे उत्पादन करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला वाटते की मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन घ्यावे. परंतु हे स्वप्न साकार करण्यासाठी अनेक अडथळयावर मात करूनच अधिक उत्पादन घेणे शक्य होणार आहे. मोठ्या प्रमाणावर किडींचा प्रसार हा भाजीपाला पिकावर होताना दिसून येतो.

Updated on 02 July, 2021 8:19 AM IST

प्राचीन काळापासून भारतीय जीवनात भाजीपाला पिकास विशेष महत्व आहे. विसाव्या शतकातही ही भाजीपाल्याचे महत्व अत्यंत वाढत असल्याचे दिसुन येते. भाजीपाला पिकाचे उत्पादन करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला वाटते की मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन घ्यावे. परंतु हे स्वप्न साकार करण्यासाठी अनेक अडथळयावर मात करूनच अधिक उत्पादन घेणे शक्य होणार आहे. मोठ्या प्रमाणावर किडींचा प्रसार हा भाजीपाला पिकावर होताना दिसून येतो.या सर्वामुळे पिकाची हानी होऊन मोठ्या प्रमाणात पीक उत्पादान घटते.आपल्या देशात किडींमुळे होणारे पिकाचे नुकसान हे साधारणपणे एक हजार कोटी पेक्षा अधिक आहे. हे नुकसान थांबावीन्यासाठी मोठ्या प्रमाणावर कीड नियंत्रण करावयाच्या विविध कीटकनाशकांची माहिती असेल तर योग्य वेळी योग्य प्रमणात कीटनाशकांची फवारणी करून किडींपासून पिकाचे रक्षण करणे शक्य होते. त्यासाठी पिकांवर येणारी किड ओळखता येणे महत्वाचे आहे. म्हणजे योग्य त्या पद्धतीने किडींचा नाश करणे सहज शक्य होते.

टोमॅटो हे महाराष्ट्रातील महत्वाचे भाजीपाला पीक आहे. विविध किडींच्या प्रादुर्भावामुळे टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते असते. या किडी कोणत्या आणि त्याचे नियंत्रण कसे करावे, याबाबतीची महिती या लेखात देत आहोत.

अ) फळ पोखरणारी अळी

टोमॅटो पिकातील ही किड अतिशय उपद्रवी असते या किडींमुळे टोमॅटो पिकाचे ३० टक्यापर्यंत नुकसान होते. ही किड वर्षभर आढळणारी आहे. ही किड टोमॅटो पिकाशिवाय हरभरा पिकात असल्यास तिला घाटे अळी म्हणतात. ही अळी कापूस पिकात बोंडाचे नुकसान करते. या अळीचा उद्रेक पाने, फुले, फळे, इ. पिकांच्या भागावर होतो. हे कीड उष्ण उपोष्ण आणि सम हवामानात ही आढळते.

जीवनक्रम:

या किडींच्या अळीचा रंग हिरवट असून बाजुला तुटक करड्या रंगाच्या रेषा असतात. या किडींचा मादी पतंग झाडाच्या पानावर, खोडावर अंडी घालते. अंडी पिवळसर व आकाराने गोल ०.५ मि. मी. व्यासाची असतात. अंडी उबण्यापुर्वी अंड्याचा रंग फिक्कट लाल होतो आणि अंड्यातून अळीबाहेर पडते. सुरवातीला अळ्या समूहाने असतात व टोमॅटोची कोवळी पाणे किंवा रोपाचा पडाशा पडतात. अळ्या सहा वेळा कात टाकतात. हा कालावधी १८ ते २५ दिवसांचा असतो. या अळींची पूर्ण वाढ झाल्यावर टोमॅटो फळ पोखरतात. एकानंतर अनेक फळे पोखरत असतात.

एक अळी आठ ते दहा टोमॅटो फळाना पोखरते. ही अळी टोमॅटो झाडांच्या खोडा जवळ कोषात जात कोषवस्था आठ ते एक वीस दिवस असते. कोषांचा रंग पंढूरका चकचकीत असतो. प्रौढ अवस्थेतील अळीची लांबी ३५ ते ४५ मि. मी. पर्यंत असते. रंग हिरवा व बाजूने काळसर तुटक रेषा असतात. डोके मजबूत व कडक असते. कोषातून बाहेर पडणारा पतंग काटक शरीराचा असतो. मादी पतंग गर्द तपकिरी रंगाची असते तर नर पतंगाच्या पंखाच्या कडा करड्या रंगांच्या असतात व पंखांची लांबी ४० मि. मी. पर्यंत असते. या किडींची पतंग आवस्था १० ते २० दिवसांची असते. या किडीचा जीवनक्रम अंदाचे २८ दिवसांचा असतो. भारतात या किडीचा उद्रेक ९६ प्रकारच्या पिकांवर आणि ६१ प्रकारच्या तण व वन्य झाडांवर दिसून यातो

हेही वाचा:सिताफळ लागवड करा व मिळवा भरघोस उत्पन्न ! जाणून घ्या; सिताफळ लागवडीची संपूर्ण माहिती…

नुकसानीचा प्रकार:

टोमॅटो पिकात अळी अवस्थेतील किड शेंड्याची किंवा रोपांचे पाने खाते. नंतर टोमॅटो अपरिपक्व अथवा पक्व किंवा लहान फळाना बिळ पाडते. टोमॅटो फळात विष्टा टाकतात त्यामुळे टोमॅटो फळे खराब होतात. सडतात व त्यावर बुरशीजन्य रोगाची वाढ होऊन पिकात रोगाची लागण होते.

नियंत्रण:

  • टोमॅटो पिकात नुकसान पातळीपर्यंत प्रादुर्भाव दिसताच मॅलॅथिऑन ३५ टक्के प्रवाही ४० मि.ली.
  • पुनर्लागवडी मुख्य पिकाच्या कडेने मका व चवळी लागवड करावी. तसेच झेंडूची लागवड केली तरी फायद्याचे ठरते.
  • लागवडी नंतर ४०-४५ दिवसांनी शेतात ट्रायकोग्रामा चीलोनिस हे मित्र कीटक १ लाख प्रती हेक्टारी या प्रमाणात ७ दिवसांच्या अंतराने २-३ वेळा सोडावेत. हे कीटक फळे पोखरणाऱ्या किडीची अंडी शोधून त्यात स्वतःची अंडी घालतात परिणामी फळे पोखरणारी कीड अंडी अवस्थेतच नष्ट होतात.
  • फळे पोखरणारी अळीच्या नियंत्रणासाठी त्यांना रोगकारक ठरणाऱ्या विषाणूंचा वापर करता येतो. हेलिकोव्हर्पा न्युक्लिअर पॉलीहायड्रॉसीस व्हायरस (एचएएनपीव्ही) १० मिली प्रती १० लिटर पाण्यातून सायंकाळच्या वेळेत फवारणी करावी.
  • ५ टक्के निंबोळी अर्क किंवा कडूनिंब आधारित एझाडिरेक्टीन (३००० पीपीएम). २० मिली प्रती १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
  • बी.टी. जिवाणूजन्य कीटकनाशक २० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यातून फवारणी करावी कारवी.
  • शेतात एकरी ५ या प्रमाणात कामगंध सापळे लावावे.
  • वेळो-वेळी किडलेली फळे काढून खोल खड्डयात गाडून टाकावीत.
  • रासायनिक कीड नियंत्रण (फवारणी प्रती लिटर पाणी) किडींचा प्रादुर्भाव अर्थिक नुकसान पातळी जवळ असल्यास क्विनॉलफॉस (२५ ई. सी.) १ मिली किंवा इंडोक्झाकार्ब (१४.५ एससी) ०.८ मिली किंवा फ्लुबेडीआमाईड (२० डब्लूजी) ५ ग्रॅम.
  • या अळीचा प्रादुर्भाव अर्थिक नुकसान पातळीच्यावर गेल्यास नोव्हॅल्युरॉन (१० ईसी) ०.७५ मिली किंवा कलोर एण्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ३ मिली.

ब) नागअळी

टोमॅटो पिकावरील कीड इतर पिकांवर सुद्धा आढते ही आंतरराष्ट्रीय कीड आहे भारतात ही कीड टोमॅटो, नवलकोल, तंबाखू, कांदा, भोपळा, मेथी पिकांवर आढळते.

लक्षणे:

अळी रंगाने पिवळी असते. माशी अगदी लहान असून सहजासहजी हातात पडतं नाही. परंतु अळी मुळे प्रादुर्भाव झालेली पाने मोठ्या प्रमाणात दिसू लागतात. अळी पानाच्या वरील पापुद्र्याखाली राहून आतील भाग कुरतडत पुढे सरकते. ही कीड जशी-जशी पुढे सरकते तशा पानांवर पांढऱ्या नागमोडी रेषा पडतात. किडींच्या प्रादुर्भावामुळे पानांची अन्न तयार करण्याची क्रिया मंद पडते. त्यामुळे उत्पादनात घाट यते.

नियंत्रण:

  • टोमॅटो रोपांची लागवड करण्यापुर्वी, रोपांची मुळे इमिडाक्लोप्रिड किंवा थायोमेथीक्झाम ५ मिली प्रती १० लिटर या द्रावणात अर्धा तास बुडवून ठेवावीत. त्यानंतर लागवड करावी.
  • फिप्रोनील १५ मि. ली. किंवा स्यान्ट्रेनिलीप्रोल १०.२६ टक्के ओ.डी. ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून रोपांवर फवारावे.
  • टोमॅटो पिकात या किडीचा रोगग्रस्त पाणे गोळाकरून नष्ट करावी.

क) टोमॅटोवरील पांढरी माशी

      ही कीड टोमॅटो, मिरची, वांगी, कोबी, शोभेच्या व फळ पिकांवर आढळते. या कीडिंका आकार ०.५ मिमी पेक्षा कमी असतो. रंग भुरकट पांढरा व डोळ्याचा रंग लाल असतो. या किडींच्या  पंखावर पंढरीभुकटी असते. कोष व किडींचा आकार फुगीर, गोलाकार असतो. पिल्ले व प्रौढ शरीरावर केस असतात. ही कीड या दोन्ही अवस्थेत पानातील रसशोषण करते. त्यामुळे पानाचा रंग पिवळसर होतो. या किडीच्या जास्त उद्रेकामुळे फुलगळ होते व फल धारणा होत नाही.

जीवनक्रम:

पांढरी माशी किडीची मादी पानाच्या खालच्या बाजूला २० पर्यंत अंडी घालते. १० दिवसात अंडी उबवून त्यातुन पिल्ले बाहेर पडतात. ही पिल्ले योग्य वास्तव्य शोधण्यासाठी झाडावर भटकतात. वास्तव्य निश्चीत झाल्यावर झाडाच्या पेशिजलात आपली सोंड खुपसून त्यातील रस शोषण करतात. या किडीची पूर्ण वाढ ७० ते ७५ दिवसात होते. वाढ झालेली कीड कोषावस्थेत जाते. ही अवस्था १६० दिवस असते. त्यातुन नंतर पांढरी माशी बाहेर पडते.

नियंत्रण:

या किडींच्या नियंत्रणा करिता मॅलॅथिऑन ५० टक्के ई.सी. किंवा डायमेथोएट ३० टक्के ई.सी. १० मिली यापैकी एकावेळी एकाच कीटकनाशकाची १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.

हेही वाचा:पावसाळ्यात द्राक्ष बागांतील समस्या आणि त्याचे व्यवस्थापन

ड) मावा

टोमॅटो पिकात मावा किडीचा प्रादुर्भाव फारच कमी प्रमाणात आढळतो. मावा कीटकांच्या प्रजाती विषाणू रोगाचा प्रसार करतात. मावा कीटकांचे शरीर मऊ व लांबोळा फुगीर आकारासारख्या असतो. त्याला दोन अंटेना व दोन संयुक्त डोळे असतात. बिना पंखाचे मावा आढळतात. मावा किडींमध्ये बिनापंख्याचा मावा किडीची संख्या पंखाच्या मावा पेक्षा अधिक असते. एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी स्थलांतरीत होताना बिनापंख्याच्या मावा किडीला पंख फुटतात. 

मावा किडीला दोन उभे पंख असतात व बाजूला चिकट द्रव टाकण्याकरिता दोन नळ्या असतात. यामुळे मावा स्वत:चे शत्रू कीटकांपासून सरंक्षण करीत असते. मावा कीड न पचविलेला गोड द्रव्य गुदद्वारातून बाहेर टाकते. ते खाण्यासाठी मुंगळे जमा होतात. यामुळे मुंगळे मावा किडींच्या ठिकाणी आढळतात. मावा किडींची उत्पत्ती नर मादीच्या समागमविना किंवा समागमानंतर होते. मावा पिल्लांची अवस्था ९ दिवस असते. एक मादी दररोज २२ पिल्लांना जन्म देते. मावा किडीची लांबी १ ते २ मि. मी. असते. डोळे लाल रंगाचे असतात. बीन पंखाची मादी वर्तुळाकार आकाराने मोठी फिक्कट रंगाची असते. पिल्लांचा रंग हिरवट किंवा करडा असतो. प्रोढ मावा २१ दिवस जगतो.

नियंत्रण:

मावा किडीच्या नियंत्रणासाठी स्यान्ट्रेनिलीप्रोल १०.२६ टक्के ओ.डी. ५ मिली फवारणी करावी किंवा डायमेथोएट ७.५ मिली प्रती १० लिटर पाण्यातून फवारावे.

इ) तुडतुडे

तुडतुडे ही टोमॅटो पिकात कमी सक्रिय पण महत्वाची कीड आहे. या किडीचा उद्रेक सध्या जातीपेक्षा संकरीत जातीत जास्त दिसून येतो. ही कीड टोमॅटो, बटाटा, वांगी, भेंडी, कापूस पिकार आढळते. ही किड हिरवट रंगाची असते व शेवटच्या पंखावर काळा ठिपका असलेली कीड आहे. अशा शरीररचनेमुळे चटकन ओळखता येतात. पिल्ले व प्रोढ तुडतुडे टोमॅटो पिकातील रस शोषूण घेतात. पिल्लांना पंख नसतात. प्रौढ तिरपे चालतात. चटकन व जलद उडी मरतात. किडींची लांबी २ मिमी असते.

याचे वास्तव्य टोमॅटो पणाच्या खालच्या समूहाने असतात. तुडतुडे कोवळ्या, रसरशीत भागातील रस शोषण करतात त्यामुळे तो भाग निस्तेज व पांढुरक्या रंगाचा होतो. या किडीचा अतिक्रमणामुळे झाड निस्तेज होऊन वाळते आणि शेवटी मरते. याशिवाय रस शोषून क्रियेतून झाडाच्या पेशीत घातक लास टोचतात त्यामुळे टोमॅटो पिकात हॉपरबर्न हा रोग होतो. या रोगामुळे टोमॅटो झाडाच्या पानाची कडा भाजल्यासारखी होते. या किडीच्या उपद्रवामुळे पानाचा आकार वक्र व चुरडल्यासारखा होतो. टोमॅटो झाडाची वाढ खुंटते.

जीवनक्रम:

या किडीत मादी पानांच्या शिरांमध्ये किंवा पेशीत ३० पर्यंत अंडी घालते. या अंड्यांचा रंग पिवळसर हिरवा असतो. त्यातून ११ दिवसात हिरव्या रंगाचे तुडतुडे बाहेर निघतात. नंतर ५ वेळा कात टाकतात, त्यानंतर या तुडतुड्यांना पंख फुटतात व प्रोढ अवस्थेत प्रवेश करतात. आर्द्रता व उष्णता योग्य प्रमाणात असतांना किडीला पोषक आहे. त्यामुळे पावसाळी हंगामात ही किडी मोठ्या प्रमाणात आढळते. या किडीचा रंग हा वातावरणावर अवलंबून असतो. जीवनक्रम २८ दिवसांचे आहे.

नियंत्रण:

या किडीच्या प्रभावी नियंत्रणा करिता मिथिल डिमिटॉन ०.०२ टक्के वापरावे, १.५ ते २ मिली व प्रोफेनोफॉस ०.०२ टक्के प्रती लिटर २ मिली प्रमाणे फवारणी करावी. जैविक नियंत्रणाकरिता क्रायसोपा सुप्त अवस्था झाडावर सोडावी.

लेखक:
राधिका वसू, डॉ. योगेश सैंदाणे, सोज्वल शिंदे
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
७०३००५००३५

English Summary: Pest management in tomato crop
Published on: 22 March 2020, 12:37 IST