नमस्कार शेतकरी मित्रांनो,
आपण आपल्या शेतीशी निघडीत दैनंदिन कामात NPK म्हणजे नत्र, स्फुरद आणि पालाश चा उल्लेख करत असतो. त्याच बरोबर त्याचा वापर हि करत असतो.
आज आपण त्याच नत्र स्फुरद आणि पालाश बद्दल येथे थोडक्यात माहिती घेणार आहोत.
NPK म्हणजे काय?
Nitrogen (N) Phosphorus (P) Potassium (K). नैट्रोजन फॉस्फोरस आणि पोटॅशिअम. NPK हि त्यांची शास्त्रीय नावे आहेत. NPK हे महत्वाचे पोषक घटकं असून त्याची पिकांना गरज असते हे घटक शेतातील मातीतून मिळत असतात त्याच बरोबर आपण काही रासायनिक आणि सेंद्रिय खताद्वारे हि ते देत असतो. हे घटक इतके महत्वाचे असतात कि याविना पिकांची नीट वाढ होऊ शकत नाही. NPK मधला प्रत्येक घटक वेगवेगळी जबाबदारी पार पाडत असतो. ती आपण आता खालील प्रमाणे पाहणार आहोत.
1-नत्र Nitrogen (N):
नत्र हे पिकाच्या पानांची वाढीसाठी जबाबदार असतात. म्हणजेच नत्र दिल्याने पिकांची पानांची वाढ चांगली होते पाने हिरवी गार राहतात. ज्याप्रमाणे प्रथिने (proteins) मानवाच्या शरीराला उपयोगी असतात त्याच प्रमाणे पिकांना हि त्याची गरज असते. ती प्रथिने नत्रा मधून मिळत असतात. जर पिकांची पाने पिवळी दिसत असतील तर नत्राची कमतरता आहे असेल समजावे लागेल. पेशी विभाजनामध्ये नत्राचा उपयोग होत असतो.
2-स्फुरद Phosphorus (P) :
स्फुरद हा घटक पिकांच्या मूळ वाढीसाठी त्याच बरोबर फुलं आणि फळं वाढीसाठी गरजेचं असतो. पिकाच्या प्रजनन चक्रामध्ये स्फुरद अत्यंत गरजेचं असत. स्फुरद मुळे प्रकाश संश्लेषण क्रिया उत्तम प्रकारे होत असते आणि यामुळेच पिके कार्बन डायॉक्साइड घेऊन आक्सीजन तयार करण्याचे काम चांगल्या प्रकारे करत असतात. नत्र प्रमाणेच स्फुरद पण पेशी विभाजनाचे काम करत असते.
3-पालाश Potassium (K)
पिकांच्या पानामध्ये छोटे-छोटे छिद्र असतात हि छोटी छिद्र प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी उघड - बंद होत असतात ज्याच्या वाटे पिके कार्बन डायॉक्साइड घेऊन आक्सीजन तयार करण्याचे काम करत असतात. पिकांना पालाश योग्य प्रमाणात दिल्यास हि छोटी छिद्र योग्य प्रकारे उघड-बंद होतात आणि प्रकाश संश्लेषण क्रियेचे काम योग्य प्रकारे होते. या पाना वाटे तयार झालेले अन्न योग्य त्या ठिकाणी पोहोचवण्याचे कार्य पालाश करत असते. उदा. ऊसाच्या पानांमधून तयार झालेले अन्न उसाच्या पेरा मध्ये रूपांतरित होते. पालाश योग्य प्रमाणात पिकास मिळाल्यास फळ आणि बिया उत्तम प्रतीच्या बनत असतात. पालाशमुळे पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते.
मित्रांनो, ही होती नत्र, स्फुरद आणि पालाश ची थोडक्यात माहिती. आता पुढच्या लेखात आपण पाहणार आहोत मी Micro-nutrients सूक्ष्म पोषक घटक आणि त्याचे कार्य. धन्यवाद मित्रांनो
स्रोत -( agriculture information)
मिलिंद जि गोदे
युवा प्रयोगशिल शेतकरी
Mission agriculture soil information
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:शुगर टुरिझम' देईल या राज्याच्या पर्यटन उद्योगाला चालना, समजून घेऊ काय आहे ही संकल्पना?
Published on: 06 May 2022, 02:44 IST