Horticulture

शेतकरी बांधवांनो, एका विशिष्ठ Grade चे खत दिल्यास खरचं पिकास फायदा होतो का? किंवा खर्चात बचत होते का? याचा आपण कधी विचार केलाय का? कृषी विद्यापीठ पिकास खत मात्राची शिफारस करताना एका विशिष्ठ खताची शिफारस करीत नाही, शिफारस ही नत्र : स्फुरद: पालाश (NPK) अशी करण्यात येते. त्यानुसार बाजारात उपलब्ध खतांपैकी कमी खर्चात आपल्या पिकास आवश्यक NPK देणारे खत शेतकरी बांधवांनी निवडावे.

Updated on 18 January, 2023 10:43 AM IST

शेतकरी बांधवांनो, एका विशिष्ठ Grade चे खत दिल्यास खरचं पिकास फायदा होतो का? किंवा खर्चात बचत होते का? याचा आपण कधी विचार केलाय का? कृषी विद्यापीठ पिकास खत मात्राची शिफारस करताना एका विशिष्ठ खताची शिफारस करीत नाही, शिफारस ही नत्र : स्फुरद: पालाश (NPK) अशी करण्यात येते. त्यानुसार बाजारात उपलब्ध खतांपैकी कमी खर्चात आपल्या पिकास आवश्यक NPK देणारे खत शेतकरी बांधवांनी निवडावे.

एका विशिष्ठ खतावर अवलंबून न राहता सद्य परिस्थितीत आवश्यक NPK चे प्रमाण पिकास कमी खर्चात कसे देता येईल हे पाहणे महत्वाचे आहे. उदा. DAP या खताच्या एका गोनीतून N- 9 किलो व P- 23 किलो आपण पिकास देऊ शकतो सध्या बाजार भावा प्रमाणे एका DAP गोणीची किंमत 1200 रू आहे.

याऐवजी शेतकरी बांधवांनी 3 SSP व एक युरिया ची गोनी घेतल्यास येणार खर्च SSP -960 रू (3 गोणी) + युरिया 266 रू =1226 रू असून त्यातून मिळणारे N- 20.7 किलो व P-24 किलो आपण पिकास देऊ शकतो. तसेच एकूण खत (Quantity) विचारात घेतल्यास DAP एक गोणी फक्त 50 किलो खत येते त्याच्या ऐवजी SSP व युरिया चे मिश्रण केल्यास 195 किलो खत येते.

चिंता वाढली! चीनमध्ये धुमाकूळ घातलेला व्हेरिएंट मुंबईत दाखल, पहिल्यांदाच आढळेल 3 रुग्ण

शिवाय 11.7 किलो N व 1 किलो P अधिक देता येईल..नाही का? आता SSP (सिंगल सुपर फॉस्फेट) मध्ये झिंक युक्त व बोरॉन युक्त असे पर्याय देखील उपलब्ध असून आपण आपल्या पिकास या सुष्म अन्नद्रव्यांची मात्रा देखील देऊ शकतात. एका विशिष्ठ खतावर अवलंबून न राहता चला आता NPK (नत्र:स्फुरद:पालाश) चे गणित मांडुया व कमीत कमी खर्चात पिकास योग्य खत मात्रा देऊयात.

काटामाऱ्यांनो तुमचे दिवस संपले! उसाच्या वजनातील झोल रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

अनेकदा शेतकऱ्यांकडे पैसे असतात मात्र त्यांच्याकडे कोणते खत द्यावे याची माहिती नसते, यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. यामुळे याबाबत शेतकऱ्यांना माहिती असणे आवश्यक आहे.

अभिजित जमधडे
मोहिम अधिकारी
कृषी विभाग नाशिक

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो नैसर्गिक शेतीचे दहा सिद्धांत
सातबारा काढण्याची ऑनलाइन सेवा बंद! शेतकऱ्यांना येत आहेत अनेक अडचणी
Bjp Grass: भाजप गवताने उडवली शेतकऱ्यांची झोप! शेतकऱ्यांना होतोय त्रास

English Summary: How much nutrients does the crop get from a bag of manure?
Published on: 18 January 2023, 10:43 IST