Horticulture

Fruit Farming: आजकाल लोक शेतीशी (Farming) संबंधित व्यवसायाकडे (Agriculture Business) अधिक आकर्षित होत आहेत. नवयुवक तरुण आता शेतीकडे (Agriculture) जास्त आकृष्ट होत असल्याचे चित्र आहे. खरं पाहता शेती व्यवसाय आतबट्ट्याचा व्यवसाय म्हणून अनेक लोक शेतीपासून दुरावत आहेत. मात्र दुसरीकडे असेही अनेक नवयुवक तरुण आहेत जे शेतीमध्ये आपल्या करिअरची सुरुवात करत असून शेतीतून लाखो रुपयांची कमाई (Farmer income) करत आहेत.

Updated on 18 August, 2022 9:56 PM IST

Fruit Farming: आजकाल लोक शेतीशी (Farming) संबंधित व्यवसायाकडे (Agriculture Business) अधिक आकर्षित होत आहेत. नवयुवक तरुण आता शेतीकडे (Agriculture) जास्त आकृष्ट होत असल्याचे चित्र आहे.

खरं पाहता शेती व्यवसाय आतबट्ट्याचा व्यवसाय म्हणून अनेक लोक शेतीपासून दुरावत आहेत. मात्र दुसरीकडे असेही अनेक नवयुवक तरुण आहेत जे शेतीमध्ये आपल्या करिअरची सुरुवात करत असून शेतीतून लाखो रुपयांची कमाई (Farmer income) करत आहेत.

खरं पाहता शेती मध्ये खर्च जास्त नाही आणि जर तुम्ही मेहनत केली तर तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. आज आम्ही अशा एका फळाच्या शेतीबद्दल सांगणार आहोत, ज्याची लागवड करून तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता. 

मित्रांनो आज आम्ही किन्नू (Kinnu Crop) फळाच्या शेती विषयी काही माहिती सांगणार आहोत. हे फळ लिंबू वर्गाचे पीक आहे. हे आरोग्यासाठी फायदेशीर असण्यासोबतच चवीलाही जबरदस्त आहे. त्यामुळे बाजारात त्याची मागणीही जास्त आहे. शिवाय बाजार भाव देखील चांगला मिळत असल्याने याची शेती (Kinnu crop farming) शेतकऱ्यांसाठी (Farmer) फायद्याची ठरणार आहे.

किन्नूची लागवड कशी करावी बर…!

जाणकार लोकांच्या मते, चिकणमाती आणि आम्लयुक्त जमिनीत किन्नूची लागवड सहज करता येते. त्याची लागवड अशा ठिकाणी करावी जिथून पाणी सहज बाहेर पडेल. किन्नूच्या लागवडीसाठी 13 ते 37 अंश सेल्सिअस तापमान योग्य आहे.

त्याच वेळी, 300-400 मिमी पाऊस यासाठी पुरेसा आहे. पिकासाठी काढणीचे तापमान 20-32 अंश सेल्सिअस असावे. किन्नूचा रंग चांगला दिसू लागल्यावर कात्रीच्या साहाय्याने याची काढणी केली पाहिजे. फळे तोडून धुतल्यानंतर नीट वाळवावीत.

किन्नू शेतीतून मिळणार उत्पन्न 

हे फळ तुम्ही किरकोळ बाजारात किंवा मोठ्या बाजारपेठेत ठोकमध्ये विकू शकता. बेंगळुरू, हैदराबाद, कोलकाता आणि दिल्ली यांसारख्या शहरांमध्ये याची भरपूर विक्री होत आहे. तसेच तुम्ही परदेशात याची निर्यात करू शकता. हे फळ श्रीलंका आणि सौदी अरेबियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी मध्ये असते.

एका झाडापासून तुम्हाला सुमारे 80-150 किलो किन्नू मिळू शकते. एका एकरात सुमारे 214 किन्नूची झाडे लावण्यात आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रत्येक झाडाची किंमत सुमारे 50 रुपये आहे.

त्याच वेळी, तुम्ही ते 20-45 रुपये प्रति नगाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात विकू शकता. संत्रा हंगाम संपल्यानंतर तुम्हाला 45 ते 50 रुपये प्रति किलो भाव मिळू शकतो. एकरी तीन लाखांपर्यंतची कमाई या पिकातून शेतकरी बांधवांना मिळू शकते.

English Summary: fruit farming kinnu farming information
Published on: 18 August 2022, 09:56 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)